Bluepad | Bluepad
Bluepad
काहीस मनातलं
 मयुरी रंजना लक्ष्मण.
मयुरी रंजना लक्ष्मण.
18th Jan, 2023

Share

आतुन कितीशी काबरी
वरती मुखवटे दुधारी..!

माडूंनी डाव उरी
किती दावीसी हुशारी..!

दिसता नाजुक परी
नजर चोरलीस भारी..!

लता कोवळी बिचारी
शिंपडलेस औषध विषारी..!

भक्ष्य भावले मनास जरी
नको बनूस शिकारी..!

कधी मिळते चतकोर भाकरी
तर कधी उपाशी भिकारी...!

पारखुन स्वतःला तरी
वाजव नतंर तुतारी..!

करुनी मत्सराची उभारी
नको बोभाटा जगभरी..!

ठेऊनी अत्तर अतंरी
शब्दास माडिंते मयुरी..!

✍️कु.मयुरी ढेबे
खोपी,खेड,रत्नागिरी
#काव्यगंध

167 

Share


 मयुरी रंजना लक्ष्मण.
Written by
मयुरी रंजना लक्ष्मण.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad