जसा जन्म होतो आणि माणूस दिवसागणिक मोठा होतो त्याबरोबरच अंगभूत गुण विकसित होतात आणि त्यातील सर्वात महत्वाचा आणि प्रखरतेने दिसून येणारा गुण म्हणजे सभ्यता.याला खरे तर गुण म्हणता येणार नाही असं वाटत असलं, तरी तो सामाजिक दृष्ट्या जोपासला गेलेला सांस्कृतिक ठेवा म्हणून आग्रस्थानी ठेवू शकतोच. याला कारण ही तसेच आहे,पूर्वी पाहुनचाराची पध्दत होती,आजही खेड्या पाड्यात ती जिवंत आहे. पाहुणे तेव्हा घरातील तरुण मुला - मुलींची सभ्यता पहायचे आणि त्याची वाह वाह करायचे.आज मात्र पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलेला आहे. आजची खरी ओळख होते ती म्हणजे ती किंवा तो काय करतो, आणि किती कमवतो. बहुधा सभ्यता/वागणूक कशीही असली तरी किती कमावतो यावर त्याचा हुद्दा ठरलेला आहे. ही झाली घरातील गोष्ट. समाज हा घरापेक्षा वेगळा नसतो.घरात मोजकी माणसे असता आणि समाजात घरातील मोजकी माणसांचा समूह. समाजात घरातीलच व्यक्ती असतात म्हणून समाजावर प्रत्येक घरांचा प्रभाव पडलेला असतोच.जेव्हा घरातील चाली रिती बदलतात तेव्हा समाज बदलाच्या मार्गावरती असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर जे काही समाजात सध्या रूढ आहे,आणि होत आहे याला सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार आहोत हे सत्य.
आपण आपली संस्कृती,सनातन धर्म म्हणून काही गोष्टी जोपासायला हव्यात आणि काही गोष्टींचां त्याग केला पाहिजे. बदलाच्या नवावरती जाहिरातीच्या स्वरूपात पाश्चिमात्य संस्कृतीचा करत असलेला दिखावा हा आपल्या सनातन धर्माला व पौराणिक संस्कृतीला विलयाकडे घेऊन जात आहे.अजून एव्हढे समजण्यासारखे तरी सभ्य आहोत यात दुमत नाही. वेळेनुसार बदल हा योग्य आहे याला कोणीही नाकारणार नाही,पण काय,किती आणि कोण याला मात्र नक्कीच मर्यादा आहेत.आणि त्याची जाणीव आजच्या पिढीला करून देणे व ते पुढच्या पिढीत रुजवणे खूप गरजेचं आहे.
येथे प्रकर्षाने सांगावे वाटते आपण बदलाचा अनुग्रह करण्यापेक्षा आपल्या सनातन धर्म आणि संस्कृतीला कशी नवीनतम ओळख देऊ शकतो याचा प्रयास झाला पाहिजे.जेणेकरून आपली स्वतंत्र ओळख जशी आहे तशीच कायम राहील.
आजचे युवक पूजाअर्चा करायला पुढे येत नाहीत,पूजा करणे देवाला भजने हे बहुधा म्हातारी किंवा अनपड लोकांचं काम (ज्यांना काहीच काम नाही असे..) आहे,असं वाटतं... वरील वाक्याला मी स्वतः समर्थन देत होतो. पण ते किती चुकीचं किंवा किती अज्ञानाचं होतं हे पुढे कालांतराने समजत - उमजत गेलं.तसं त्या कार्याची महती कळू लागली.आज पूर्ण जग योगा करतो, ही आहे आपली सनातनी धार्मिक संस्कृती. ज्या ज्या प्रमाणात आपण पाश्चिमात्य भाषेचा अंगीकार करत गेलो त्या त्या प्रमाणात त्या संस्कृतीने आपल्या समाजात शिरकाव केला.आणि आपण आपल्याच सनातन धर्माची प्राचीन संस्कृती विसरू लागलो.याला कोठेतरी पूर्णविराम देवून आपल्या संस्कृतीकडे वाटचाल केली पाहिजे. आज आपण मुलांसाठी इंग्लिश शिक्षणाचा करत असलेला हट्टहास असो वा दिसण्यासाठी बदलत असलेला पहेराव.हे सर्व बदलायला हवं.देशात शिक्षणाचा बोलबाला आहेच,,, कमी गुण म्हणून झालेली आत्महत्या ही बातमीच मुळात ह्रदयाचा थरकाप उडवते.शैक्षणिक गुण फक्त नोकरी मिळवण्याच्या कामी येतात.आयुष्यात गुणांचा काय तो एव्हढाच फायदा. शिक्षणाने माणूस बनवलं पाहिजे,आपली सनातनी संस्कृती जपली पाहिजे,सस्करांचा ठेवा जपला पाहिजे. सनातन धर्म म्हणून नाही तर आपला इतिहास म्हणून जोपासला पाहिजे.
चला तर मग सुरुवात करू आपली सनातन संस्कृती माणसात रूजविण्याला....