||"सय्यम,"||
आयुष्यात कितीही मोठे बना,पण माणुसकीची कास सोडू नका,?
सु:ख,दुःखात साथ द्यायला,कधी कुणी विसरू नका,?||1||
आयुष्य फार कमी आहे,गंबीर बनून जगू नका,?
जगात आपले काहीच नसते,गमावल्याचे दुःख करू नका,?
अमुक,तमुक,असा अहंकार बाळगू नका,?
सर्व्हांशी प्रेमाने वागा,जात, धर्म,तत्व यात अडकून पडू नका,?||2||
स्वतःचा भरवसा नाही,कुरापती काढत बसू नका,?
हजारो संकटे येतील,क्षुल्लक गोष्टीने विचलीत होऊ नका,?
जरा मोकळे पणाने हसा,जगाचा विचार करू नका,?
काय घेऊन जाणार आहात,नसस्ती चिंता करू नका,?||3||
सर्व्हांशी चांगले वागा,कसलाही कमी पणा मानू नका,?
सद्बुद्धीने वागा,कुणाचाही द्वेष करित बसू नका,?
आडाणी आई बाबा,अपमान त्यांचा करू नका,?
चरणा मध्ये देव त्यांच्या,मंदिरात नुसते जाऊ नका,?||4||
मदत करणाऱ्याला,कधीच धोका देऊ नका,?
फसवे गिरी करणाऱ्याला कधीच साह्य करू नका,?
स्वाभिमान सोडू नका,?पण गर्व ही बाळगू नका,?