Bluepad | Bluepad
Bluepad
एक संन्यासी योध्दा..!
शंतनु जाधव.
शंतनु जाधव.
18th Jan, 2023

Share

मरगळलेल्या समाजाचा देश जो स्वतःचे सत्व विसरलेला होता ,त्या देशाला गतवैभवाची आठवण करून देऊन स्वतःत आत्मविश्वास भरणारा , त्याला फिनिक्ष पक्षाप्रमाणे उभारी देणारा , जगातील अन्य देशांना स्वतःच्या देशाविषयी मनातील प्रतिमेत नकारात्मक प्रतिमेपासून सकारात्मक बदलण्यास भाग पडणारा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद , आणि त्यांचा देश म्हणजे आपला भारत देश . १२ जानेवारी ही त्यांची जन्मतारीख . त्याबद्दल त्यांना विन्रम आदरांजली . त्यांची जयंती भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केली जाते.
एक संन्यासी योध्दा..!
स्वामीजींनी निव्वळ जगाला भारताविषयीची साप गारुड्यांच्या देश ही प्रतिमा बदलून थोर ज्ञानाचा देश अशरायलाच लावली असे नव्हे तर , भारतातील गोरगरिबांची सेवा देखील केली . रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ही त्याचीच प्रतीके . मी स्वतः रामकृष्ण मठातील युवक वर्गाचा फायदा घेतला आहे . खूप प्रेरणादायी अनुभव प्रत्येकवेळेस मला आला आहे.
स्वामी विवेकानंदानी पाशात्य देशात भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली याची सुरवात झाली . ती सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेल्या सुप्रासिद्ध भाषणापासून त्या पासून त्यांच्या निर्वाणापर्यत म्हणजे ४ जुलै १९०२ अव्याहतपाने सुरूच होती . किंबहुना आजही त्यांनी उभारलेल्या वेदांत सोसायटी आणि तत्सम संघटनांतर्फे सुरूच आहे . स्वामींजींनी आपल्या ९ वर्षांच्या पाशात्य जीवनात फार मोठे कार्य केले . त्याची जाणीव आजही त्यांचा निधनानंतर १०० वर्षे झाल्यावर सुद्धा घेण्यात येते यातच सर्वकाही आले.
स्वामीजींनी भगव्या कपड्याला नवी ओळख करून दिली . ती आपल्या समाजसेवेव्दारे .पूजनीय रामकृष्णांच्या निधनानंतर गुरुबंधूबरोबर त्यांनी समाजसेवेला सुरवात केली ती रामकृष्ण मठ स्थापून . साधूंनी निवळ ईश्र्वराचे ध्यान ना करता दीनबंधूंची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आपल्या भारतमातेला सेवेला जुंपले पाहिजे याबाबत ते आग्रही होते . लोकांनी स्वतःचे देव बासनात गुंडाळून पुढील शंभर वर्षे फक्त भारतमातेची पूजा करायला हवी . असे मत त्यांनी एका ठिकाणी व्यक्त केले होते .
आपल्या ३९ वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेले कार्य खरोखर अतुलनीय होते . त्यांच्या कार्य ब्लॉगच्या एका पोस्टचे होऊच शकत नाही . त्यांनी भारतीयांना शिकलेला राजयोग ,भक्तियोग , प्रेमयोग , ज्ञानयोगप्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचायलाच हवा.
भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली . त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले. त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जागृत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले . पड्डूचेरीला ( जूने नाव पॉडेचरी ) ज्यांचा आध्यात्मिक आश्रम आहे, त्या योगी अरविंदो यांना क्रांतीकारकापासून अध्यात्मककडे वळवण्याकडे स्वामी विवेकानंद यांची मोठी प्रेरणा होती .योगी अरविंदो यांना तुरुंगात स्वामी विवेकानंद यांनी दृष्टांत दिला होता, असे म्हणतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आयुष्यात विवेकानंद यांच्या विचारांनी केलेली क्रांती सुविख्यात आहेच. ते आत्महत्या करायला रेल्वे स्टेशन वर गेले होते . रेल्वे येण्यास कालावधी असल्याने त्यांनी वेळ घालवण्यासाठी स्वामी विवेकानंदाचा विचारांचे पुस्तक घेतले, पुढे घडलेला इतीहास सर्वश्रुत आहेच
भगव्या कपड्याना एक वेगळा अर्थ त्यामुळे प्राप्त झाला ,यात वादच नाही. स्वामी विवेकानंद उत्कृष्ट नियोजन तज्ञ आणि संघटक होते. सप्टेंबर 1893 नंतर 4 वर्ष स्वामीजी युनाटेड स्टेट्स मध्ये होते, त्या कालावधीत ते आपल्या भारतातील सहकार्यांसी पञव्यवहार करत असे तो वाचला असता आपणास ही गोष्ट सहज लक्षात येते (हा पञव्यवहार मराठीत पण उपलब्ध आहे रामकृष्ण मठाच्या नागपुर शाखेने तो मराठीत आणला आहे जिज्ञांसुनी तो अवश्य वाचावा ) स्वामीजींची केवळ अध्यात्मावरच पकड होती असे नव्हे तर ते वर्तमानावर नजर ठेवून भविष्याकडे लक्ष असणारे अतूलनीय व्यक्तीमत्व होते. त्यांनी 19 शतकाचा अखेरीस असे लिहुन ठेवले आहे की युरोपात लवकरच मोठे यूध्द होऊ शकते दुर्देवाने स्वामी विवेकानंद यांचा निधनानंतर 12 वर्षांनी पहिल्या महायुध्दाला सूरवात झाली.
स्वामी विवेकानंद यांनी केवळ मतमतांत अडकलेल्या धर्माला या चक्रातुन दुर काढत समाजाभिमुख केले . समाजाला विचारप्रवण बनवले त्याचा जिवनातील कित्येक प्रसंग याची साक्ष देतात मग खेञीचा महाराजाचा मुर्तिपुजेचा प्रसंग असो किंवा रेल्वेस्टेशनवरील स्टेशन भास्तरांचा प्रसंग असो नरेंद्रनाथ दत्त यांची महाविद्यालयीन जिवनातील ईश्वराची शास्ञीय पध्दतीने केलेली चिकित्सा असो लहानपणी भुतांचा भितीवर त्यांनी स्वार होउन केलेले धाडस असो किंवा जहाजावरील मिशनरींचा हिंदू धर्मावरील चर्चेचा वेळी दाखवलेले धाडस असो त्यांचा जिवनात असे कितीतरी प्रसंग सापडतात.
मदत करणाऱ्यांच्या विषयीची कृतज्ञेतेची भावना हा सूध्दा स्वामी विवेकानंदाचा मोठा गुण होता. हा गुण काकडी घाटाचा प्रसंग असो किंवा 1897 ला अमेरीका गाजवून आल्यावर भारत भुमिवर पहिले पाउल पडल्यावरचे त्यांनी व्यक्त केलेले मत असो. (त्या वेळेस त्यांनी दिलेली व्याखाने कोलंबो तो अलमोरा या नावाने प्रसिध्द आहेत स्वामी विवेकानंद ब्लॉग एका पोस्टचा विषय नाहीतच मात्र लेखन कुठेना कुठे थांबवणे आवश्यक आहे म्हणून इथेच थांबतो.
@ शंतनु निळकंठ जाधव.

177 

Share


शंतनु जाधव.
Written by
शंतनु जाधव.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad