श्रजय सोनोग्राफी करून घरी आला...
मी - काय म्हंटले डॉक्टर?
श्रजय - खडा आत्ता "Ureter" मध्ये आहे.
मी - "Ureter" नाही ते "Uterus" असतं.
श्रजय - (अगदी लहान मुलासारख) अरे हो बहुतेक चुकलंच माझं. पुन्हा नाही म्हणणार. तुझच बरोबर असेल.
दोन दिवसानंतर त्याच्यासोबत मी हॉस्पिटल मध्ये गेले. डॉक्टर ने सोनोग्राफी करायला सुरवात केली.
डॉक्टर- Ureter मधून खडा bladder मध्ये यायला अगदी १ cm अंतर राहिलय.
श्रजय - ओके.
तिथून बाहेर निघाल्यानंतर मला तर डॉक्टरच्याच ज्ञानावर शंका यायला लागली. अरे हा MD डॉक्टर "Uterus" ला "Ureter" का म्हंटला असावा?
मग म्हंटल आपल्या Google गुरुजींशिवाय या जगात कुणीही हुशार नाही. गुरुजींनी लगेच उत्तर दिले. Ureter म्हणजे "मुत्रनलिका" आणि "uterus" म्हणजे गर्भाशय.😂😂😂
श्रजयसमोरच जोरजोरात हसायला लागले. त्याने विचारले काय झाले? त्याला सांगण्याची हिम्मत होईना. लाज वाटत होती. पण विचार केला अरे नवरा पण तर विज्ञान शाखेचा विद्यार्थी. त्याला कळायला नको??? ( माझच कसं बरोबर हे सिद्ध करण्यात स्त्रियांनी विशेष प्रावीण्य मिळवलेल असतं). पण जरा वेळ घेत सांगितलच. पुढचं संभाषण -
श्रजय- मी सांगितलं होत ते ureter च आहे पण तू फारच आत्मविश्वासानं बोललीस म्हणून म्हंटल बरोबर असेल. माझ्याच ऐकण्यात चूक झाली असेल.
मी - तू पण विज्ञान शाखेत शिकलास ना?
श्रजय- तू तर सगळंच शिक्षण त्यातलं...
फार चुका मान्य न करणारी...
मी - त्या दोन शब्दात फार थोडा फरक आहे म्हणून थोडा गोंधळ झाला... पण तुलाच कळायला नको. तुझ्यात कसं uterus असणार ते😔
असं बोलून अगदीच ओशाळल्यासारख हसले आणि घरी येऊन दीदींना हा किस्सा सांगून स्वतःच्या मूर्खपणावर खूप हसले
(तळटीप - हसावे पण माझ्या मूर्खपणावर कॉमेंट करू नये😂😂 )
शब्दांकन - अश्विनी सोनवणे - अभोणकर