काहीं घटना, काहीं गोष्टी, काळजाला इतक्या स्पर्श वुन जातात की त्या कधी च विसरल्या जात नाहीत. ताज्या तवान्या होऊन जशाच्या तशा नजरे समोर उभ्या राहतात 🌹 आता मला सेवा निवृत्ती घेऊन दहा वर्ष झालें. पण सकाळी सकाळी 8 वाजता ती kalyan RMS च्या ऑफिस च्या दरवाजावर पडणारी थाप अजुन ऐकु येते. बाई अहो माझी श्रृंगारिका पाहिली का? कुठे ठेवलीय तिला. 🌹 . ........ अरे बाप रे इतकं शुद्ध सुसंकृत बोलणारी ती माऊली नक्कीच सुसंस्कृत घरातील नि शिक्षित असणार एवढ नक्की असणार असे वाटले. 🌹 ... पाहिले तर , उंच गोरी पान, मोठे गोल लालं भडक सुंदर कुंकू, तेजस्वी बोलक्या डोळयां ची 60तील माऊली. पण 50शी च्या वाटव्या इतक्या काटक नि खणखणीत आवाजाच्या 🌹 सरळ कोपऱ्यातील लक्समी घेऊन, अंगण नि आवर साफ करू लागल्या. म्हटलं अहो मावशी सफाई कामगार येऊन करतील हें काम. ...... ..नाही नाही बाई, मी तुमच्या कडुन चहा पिते, मग फुकट कसा प्यायचा. आणि हें माझंच घर अंगण आहे. नंतर खरी कहानी मावशी च्या च तोंडून कळली. मावशी चें पती मिलिटरी मध्यें होते. दुर्दैवा ने ते नव्याने नोकरीत असताना च सिया चीन बॉर्डर वर अपघाती मृत्यू ने गेले. तो धक्का मावशीला सहन झाला नाही, पदरी मुल ना बाळ, सासर जमीनदार शेतकऱ्याचें होते, पण सासर च्या लोकांनी प्रापार्टी तुन बेदखल करत, एवढे मोठे वाड्या सारखे घर असताना त्या घरातुन ही हाकलुन दिलें. माहेर च्यांनी ही आधार दिला नाही. मावशी रस्त्यावर आली ती थेट कल्याण रेल्वे प्लॅट फॉर्म न 7 ला, त्या ऑफिस मध्यें आल्या की आम्ही त्यांना चहा,नाष्टा देऊ लागलो, पण तो पण माउलीला फुकट नको असायचा. कधी भाजी बाजारात त्या छोटी मोठी भाजी विकताना दिसायच्या. अशा किती तरी निराधार नटसम्राद्नी बेघर होऊन दुःखी आहेत. पण त्या हिंमत हरत नाहीत. निसर्ग दत्त ताकत ईश्वरा ने तिला दिलेली असते, म्हणुन तिची वेदना ही सुगंधी होते. नि जगाला आदर्श ठरते 🌹म्हणुन च मावशी च्या हिमतीला दाद देणारीं ती साद मला ऐकु येतेय, अग माझी ती श्रृंगारिका कुठे आहे बाई🌹 ..सुलभा हनुमान वाघ 🌹 21=10=2021