प्रेम कुठे कसे कधी होईल सांगन अशक्य
प्रेमाच्या त्या खूना कळन अशक्य
कोण जाणे कधी होईल टक्कर
मी हरवेन त्यात लागेल मला वेडं
आजवर तर कोणी नाही मिळालं खास
कोण जाणे कधी कुठे रंगतील गप्पा थाट
नजरेच्या आळोख्यात बसेल बेभान
इशाराच्या बोली ला देईल तो साथ
कोण जाणे ते प्रेमळ ठीकाणं
आहे कुठंल्या जागी जिथे भिडतील नजरा
रंग भावनांचा प्रेमळ गावी
कोण जाणे कधी कुठं भेटेल बेभानी
सैरवैर मन होईल गाईल रे गाणी
प्रेमाच्या त्या गुंफनात अडकणार मी कधी
मिळेल राजा तो स्वप्नातला कुठं
शोधून थकले अता मी तव
कधी भिडणार आमची टक्कर
कोण जाणे कोण असेल
तो तर स्वप्नाचा राज्यात मिळेल
कोण जाणे कधी कुठे मिळेल तो स्वप्नस्पंदी
_संजना पाटोळे