नात्यात हा दुरावा आला कसा कळेना
चुकले कुठे कशी मी माझे मला कळेना ||
डोळ्यातूनी कितीदा मन वाचले मी तुझे
झाले कसे नी काय शब्दांत सांगवेना ||
का हा असा दुरावा अपुल्यात आज आला
परक्यापरी अशी मी माजला हे सोसवेना ||
तू बोल मोकळी हो आहे मी तूज साठी
जन्मांतरीची गाठ सहजीच ती तुटेना ||
ये एकदा जवळ तू परतून या कुशीत
मग दुःख कोणतेही तुजला कधी शिवेना ||
*©®🖊️अश्विनी कुलकर्णी/जोशी,सोलापूर*