🌹आठवण तशी जुनीच, पुन्हा नव्याने.🔶
............................................................. 🙏🙏
🔶ही कविता आहे डिसेंबर २००६ मधली. कवी आहेत नंदकुमार तिवाटणे. माझ्या संग्रहीची ही सुंदर कविता.🔶प्रौढपणात कविमनाला जपणारी तेही पर्सनल विभागात कार्यमग्न अधिकारपदावर असतानाची. 🌺 त्याची प्रतिभा फुलली. मनात काव्य प्रतिभा उतरली. 🔶कामगारांना गैरहजेरी बाबत सतर्क करून त्यांचे प्रबोधन🔶 हे फक्त आणि फक्त वालचंदनगरातच घडू शकते.🌺
❤झाडाला पालवी आणि माणसाला कंठ देणारी. गळा देणारी वालचंदनगर --ची भूमी.🔶तिवाटणे साहेब वालचंदनगर इंडस्ट्रिज मध्ये सेवारत होते.बऱ्याच मुखी त्यांचे नाव होते. ही पहा त्यांची काव्य दृष्टीची आठवण कवितेतून प्रबोधन करणारी. 🙏🌹
🔶कविता : ' गैरहजरी ' 🔶
..................................................................
कवी : नंदकुमार तिवाटणे.
..................................................................
स्वसमस्याचा ढीग भारी,
गोधळ मनी उमजेना.
प्राध्यान्य देऊ कशाला,
माझे मला समजेना.
कामात खोळंबा,
नुकसान आर्थिक भारी.
खास सुविधा मानाच्या
मुकावे लागते भारी.
जाऊंनी व्यसनाच्या आहारी
अपव्यय वेगळा द्रव्याचा.
बुडूनि कर्जत अती,
निंदा व्हावी सदाची.
बिघडले स्वास्थ मनाचे
थरथरती हात सदा
व्यसनाने दुरावती स्नेही
नशीब दावते वाकुल्या.
बढती कसली, अवनीती सगळी
मनी दाटावी कुचंबना
नकॊ नकॊ त्या टोमण्यांनी
भांडवले बेजार जीव जाहला.
द्रव्य असता गाठी जवळ येती
मित्र सगे सोयरे.
सरता द्रव्य, रिकामा खिसा
कोण कोणाशी पूसे.
घर न उरलेे मनी भ्रान्त अशी
पत न उरली या बाजारी.
यातनानी तनमनासी घेरले
कितीक भोग लेकरा उरले.
गैरहजर माझिया दफ्तरी
योग्य नाही सर्वोतपरी.
व्यसन्मात्रे जगणेच सारे
घाव दुःखाचे जिव्हारी.
नकॊ! नकॊ! कारवाई ती
शिस्तभंग! शिस्तभंग !
शोधणे गरजेचे वाटे
हीत आपले कश्यात रे.
तोंड द्या तुम्ही समस्येला
पाठ कदापि ती दावू नका.
वाढवूनी उपस्थिती कामावर
चांगली उपस्थिती ' बक्षीस ' घ्या.
जबादार कामगार असा मी
उत्पादना वाढवतो.
उत्पादकतेचे महत्व जाणून
प्रोडिक्टिव्हिटीची उंची गाठतो.
नको गैरहजेरी ध्येय मी बाळगतो
उद्यमाचे घरी देवता लक्ष्मी
भरते पाणी ' गीत मी आळवितो.
.... नंदकुमार तिवाटणे, पर्सनल अँड वेलफेअर डिपा.
वलचंदनगर.
( संग्राहक : शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर )
...........................................................................
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
...........................................................................