काहीच सुचत नाही आता डोक्यात , अडचणींचा आता डोंगर उभा ठाकलाय
पाय रोवून जमिनीवर तरी पण त्याला मी हात लावलाय...
मी आता सोडूनच दिलंय रडणं पडणं , आता फक्त ठरवलय जे होईल ते घडू द्यायचं मग पुढचं पुढं बघायचं
किती घुसमट ,वेदने च्या आहारी जायचं , बस आता सगळ्यातुन निवृत्त व्हायचं , आणि फक्त आनंदी जगायचं
कैक देतील उपदेशाचे डोस , सल्ले येतील ढीगभर ,काय घायचं काय सोडायच तूच आता तो स्वतः विचार कर..
सोपं करून टाकलं एकदम जगणं आता ,धडपड थोडी शांत झाली ,मीच माझ्या वाईट विचारांची आतल्या आतच होळी केली...
संपन्न!