हल्ली 'Counseling करून घे किंवा Counsellor कडे जायला हवं (मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरत आहे, माहीत आहे मला , याला मराठीत 'समुपदेशन आणि समुपदेशक' हा शब्द आहे, पण इंग्रजी जास्त रूळलेलं असतं म्हणून हे सगळं) असं सर्रास कानावर पडतं. कोण असतात हे Counsellor ? .. Counsellor म्हणजे ज्यांच्याकडे Counselling करण्यासाठी मानसशास्त्र या विषयातील पदवी आहे.. यातही अनेक प्रकार आहेत, कोणी नातेसंबंध, व्यवसाय, लहान मुलांचे प्रश्न , पौंगडावस्थेत असणाऱ्या मुलांचे प्रश्न... अशा वेगवेगळ्या क्षेत्रात Counselling चे काम करतात.. डिप्रेशन आलंय, काहीतरी मनात दुःख आहे जे खूप वर्षांपासून सलतयं.. तेव्हा लोकं Counsellor ची मदत घेतात.. खरंतर एक Counsellor हा व्यक्तीला मनातल्या भावनांची होणाऱ्या घुसमटीतुन सोडवणारा एक उत्तम पर्याय असतो.. पण खरंच अस असतं का?.. खरंच Counsellor सल्ले देतात का?..
या बद्दल मी माझा अनुभव सांगते, तसं माझं शिक्षण M.A. in Clinical Psychology असे आहे, आम्ही क्लीनिकलवाले मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करतो.. परंतु Counselling हा शब्द इतका रूळला आहे की लोकं 'तुम्ही Counselling करता का ? असं विचारतात.. क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट तसे counseling करू शकतात.. पण मी आणि प्रतिक्षाने 'Counselling' चे इतर कोर्स केले आहेत तर अशा केसेस आम्ही घेतो.. let's come to the point ..
पाच वर्षांच्या अनुभवात जाणवलं, जेव्हा एक व्यक्ती Counselling साठी येते .. तेव्हा ती काही पहिल्याच सेशन मध्ये सगळीच खरी माहिती देत नाही.. इथे मानसशास्त्रातील 'निरीक्षण पद्धती' आमची मदत करते.. आम्ही आपलं समोरची व्यक्ती 'काय बोलते?' इतकंच लक्षपूर्वक ऐकतो..
सहसा 'ऑन कॉल' घेतलेली conseling बऱ्याच अंशी उपयोगी पडलेली दिसून आली.. कारण लोकं बोलत जातात, व्यक्त होतात, अगदी न थांबता बोलतात..कारण त्यांना भीती नसते की आपण जे बोलतोय त्या समोरच्या व्यक्तीला आपण पाहिले आहे, इथे एक लक्षात येतं, व्यक्तीला आपले जे काही दुःख आहे, सिक्रेटस आहेत ते अशाच कोणत्यातरी व्यक्तीला सांगायला आवडतात किंवा ते सांगण्यासाठी ते स्वतःला सुरक्षित समजतात.. जेव्हा ते समोरच्या व्यक्तीला ओळखत नसतात, जिथे त्यांना भीती नसते की 'या व्यक्तीला माझ्या बद्दल असलेली माहिती हा अजून माझ्या ओळखीतल्या लोकांना सांगेल'.. सांगण्याचे तात्पर्य हेच की, प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या 'भावना व्यक्त करण्यासाठी एका अशा एका व्यक्तीच्या शोधात असतो, जी त्याला कोणत्याही प्रकारे जज न करता त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेईल..आणि ऐकून घेतल्यावर त्याच्या भावनांची वाच्यता इतर कुठेही करणार नाही..
Counsellor खरंतर अशा सर्व लोकांसाठी 'ऐकणारा कान' असतो जो फक्त एकाच कानाने ऐकतो आणि त्याची खबर दुसऱ्या कानाला होऊ देत नाही.. कारण सेशनच्या शेवटी जेव्हा क्लायंट म्हणतात, 'मॅडम, तुमच्याशी बोलून छान वाटलं.' तेव्हा वाटतं, अरे इतका वेळ तर हेच बोलत होते, आपण तर ऐकायचं काम केलंय' मानसशास्त्राच्या मदतीने त्या व्यक्तीला त्याला काय हवं हे शोधण्यात मदत केली आहे..
केसेस हँडल करताना इतकंच जाणवत.. की प्रत्येक व्यक्तीला 'त्याच मनापासून कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं.'
आज इथेच थांबते.. उद्या पुन्हा भेटू.. याच सदरात..
Counsellor च्या डायरीतून..
क्रमश:
©®स्नेहा..
आमच्या पेजला follow करा..
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0ceCsHurhnrivTuW7fMXpou7TD63VqSX4weyPa21sXRVxGKho3buvgmiQQE4GJF5nl&id=100063855259061&mibextid=Nif5oz