Bluepad | Bluepad
Bluepad
हे खूप पटलंय
Sneha K
Sneha K
18th Jan, 2023

Share

हे खूप पटलंय
मा. नागराज मंजुळे यांचं म्हणणं जास्त पटलंय मला , कारण भाषा ही प्रत्येकाची व्यक्त होण्याची स्वतंत्र शैली आहे, त्यात तुमचा बोलण्याचा 'स्वर' हेल , ही प्रदेशानुसार, गावानुसार, तुमच्या सांस्कृतिक, पारिवारिक भाषेच्या जडण-घडणीनुसार होते. त्यात शुद्ध आणि अशुद्ध अशी विभागणी खरंच नसावी.. कारण जन्म मुंबईचा, शालेय शिक्षण अतिशय चांगल्या शाळेत झाले, घरात 'शुद्ध मराठी' ज्याला म्हणतात अशी आई आणि वडील , तसेच घरातील इतर माणसं त्यामुळे 'भाषा शुद्ध असणे हे ओघानेच आलं' आजही बरेच लोकं कौतुक करतात, 'तुझी भाषा, बोलणं छान आहे वैगेरे वैगेरे'.. पण या परिस्थिती मध्ये कोणी गावाकडच्या व्यक्ती संपर्कात आल्या की त्यांची भाषा ऐकून वेगळं वाटायचं, की असं कसं बोलतात हे?..
मनात विचार सुरू असायचे 'हा शब्द असा नाही , असा बोलतात'..(हे सगळं लहानपणी वाटायचं कारण भाषा शुद्ध हवी ही सक्ती).. मोठं होताना कळलं दर चाळीस किलोमीटरला भाषा बदलते, तिचा लहेजा, स्वर बदलतो, काही शब्दांचे अर्थही बदलतात..तेव्हा प्रश्न पडला की 'शुद्ध आणि अशुद्ध असे भाषेचे परिमाण असावे का?'.. भाषेचा मला आलेला अजून एक अनुभव म्हणजे जेव्हा कधी मुंबई बाहेर गेले तेव्हा संपर्कात येणारे लोकं 'सहजपणे माझ्याशीसहजपणे बोलत नसतं.. या प्रश्नाचे उत्तर मला माझ्या आत्याच्या घरी गेल्यावर मिळाले तेही आठवीत असताना (माझी आत्या औरंगाबाद इथे राहते)..आत्याचे मोठे दीर म्हणाले, 'तू न या टीव्हीतल्या बाई सारखी बोलतेस'.. (टीव्हीवर बातम्या सुरू होत्या).. तेव्हा लक्षात आलं की आपलं बोलणं यांना वेगळं वाटतं.. शेजारी राहणाऱ्या छाया ताई स्पष्टपणे म्हणाल्या, तुझी भाषा खूप छान आहे, पण लोकांशी बोलताना आपण त्यांच्या भाषेत बोललं तर खूप सोपं पडत, तू लोकांशी लोकांसारखं बोलत जा.. आणि बघ काय होतं.. त्यांच्या या सल्ल्यामुळे मी जितकं जमेल त्या त्या गावाकडच्या भाषेची 'टोन' त्यांचे शब्द शिकून घेतले, आणि आता शिकायला मजा वाटते.. यामुळे आज मी कुठेही गेले तरी मी त्यांना त्याच्यातलीच एक वाटते..😊 जगणं सोपं होतं😊 कधी कधी काही असेही म्हणतात, 'तुम्ही आम्हाला आमच्यातल्याच एक वाटता'..
शुद्ध आणि अशुद्ध भाषा या तुलनेत न पडता .. भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला आपलंसं केलं की 'भाषा तुम्हाला माणसांच्या जवळ नेते हे कळलं'..शुद्ध आणि अशुद्ध भाषा ही तुलनाच नसावी कारण 'भाषा ही स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी असते'.. शुद्ध-अशुद्द अशा कसोटी साठी नाही..शेवटी काय?.. शब्द नाही ..समजून घ्यायची असते ती शब्दामागची भावना.. ©®स्नेहा..
१८/०१/२०२३

190 

Share


Sneha K
Written by
Sneha K

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad