अंग प्रदर्शन ? विकृती ? स्वातंत्र्य ?
गेल्या काही दिवसांमध्ये उर्फी जावेद हे प्रकरण रंगलं होत. चित्रा वाघ, अमृता फडणवीस ह्यांनी उर्फीच्या वक्तव्यावर त्यांच्या व्यक्तिगत प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांचे मत असे कि उगीचच उर्फीला लोक महत्व देत आहे हि मीडिया. उर्फी व्यतिरिक्त देखील अनेक महत्वाचे विषय आहेत. परंतु उर्फी जे काही करतेय ते समाज विघातक नक्कीच आहे..
गेल्या वर्षी घडलेली एक घटना मुद्दाम शेअर करू इच्छित आहे. मुंबईत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थिनीने बाथरूम मध्ये जाऊन स्वतःचा "नको" त्या अवस्थेतील एक फोटो काढून शेअर केला.. हि बाब उघड झाल्यावर त्या मुलीशी ह्या बाबत चर्चा करण्यात आली.. त्यातून एक धक्का देणारा "विचार" शाळेसमोर आला.. त्या विद्यार्थिनीला आपल्या कृत्याचा पश्चाताप नव्हताच. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या मैत्रिणी "असे" फोटो सर्रास काढत.
इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर देखील २०१७ नंतर "अंगप्रदर्शन" करणारे फोटो जास्त फिरत आहेत. हिंदू संस्कृती नुसार अंग उघड टाकून फोटो काढणे हे योग्य कि अयोग्य ह्यावर मी बोलणार नाही. परंतु मानसिकता ह्यावर मला नक्कीच बोलावेसे वाटेल. नऊवारी साडी घालून गळ्यात किंवा शरीरावर अन्य ठिकाणी दागिने मढवून काढलेले फोटो म्हणजे सौंदर्य. आणि शरीर प्रदर्शन करणारे फोटो म्हणजे विकृती..
असे फोटो मुळात काढावेसे का वाटतात? आजूबाजूला जे काही घडत तेच सत्य किंवा "ट्रेंड" समजून फॉलो करणारा समाज.. मुळात ती उर्फी जावेद हि पांढरी पाल वाटते. आणि ती उघडी फिरते कारण तिच्या बाजूला लाख भर रुपये पगार घेणारे बाऊन्सर्स किंवा अंगरक्षक असतात.. स्त्री हि फक्त तिच्या शरीराने नाही ओळखली जात.. परंतु हल्ली स्त्री म्हटलं कि शरीर हीच एक भावना सर्वांच्या मनात फिट्ट बसली आहे. अगदी मी सुद्धा त्याला अपवाद नाही बरं का..
अहंकार, स्पर्धा,तुलना ह्या मागे धावताना माणूस शरीराचा देखील वापर करू लागला आहे.. स्त्रियांच्या मानाने पुरुषांचे फोटो फार कमी आहेत. परंतु आहेत.. स्त्रिया.. विशेषतः भारतीय स्त्रियांना हि गोष्ट पटत नाही कि श्रद्धा,निर्भया,हर्षिता,हिना अश्या अनेक तरुणी आपला जीव गमावून बसल्या आहेत.. काही बलात्काराने पीडित तर काही लव्ह जिहाद चा शिकार किंवा लव्ह जिहाद ला बळी....
अंग प्रदर्शन करणे न करणे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असू शकतो.. परंतु आपण जी ऍक्शन करतो त्याला रिऍक्शन येणार हे हि ध्यानात असू द्यात.. सेक्स्टिंग हा विषय देखील ह्यातूनच निर्माण होतो. सेक्स्टिंग म्हणजे काय ह्यावर मी नंतर बोलणार आहे.. पैसे कमविण्यासाठी छोटे व तंग कपडे घालणे, अँप बनवून त्यावर आपले फोटो व विडिओ "सेन्सेशनल कन्टेन्ट" म्हणून टाकणे व लोकांना पैसे भरायला लावून आपले शरीर अथवा फोटो विडिओ शेअर करणे हि भारताची संस्कृती नाही.. ज्या स्त्रिया अश्या प्रकारचे अँप निर्माण करतात त्या समाज विघातक आहेत.. वेळीच आपल्या बहिणींनी,बायकोने,आईने व मैत्रिणीने सावध व्हावे. सायलेंट किलिंग हि अश्याच प्रकारातून निर्माण होते..
अभिषेक रानडे
शोभिका आर्टस्