.....वाईन शॉप...
दारूच्या दूकाना समोरची पाहून रांग
न पिताच चढते मला घोटवलेली भांग
मनाची बडबड मनचं ऐकतं राहतं
दुसरं म्हणतं पिऊ दे त्यांना तुझं काय जातं
गर्दीत वयाची विविधाता ठासून भरलेली असते
जात - पात धर्म - अधर्म कशाचंच बंधन नसते
गर्दीने पाय दुखू नयेत म्हणून विचार व्हायला हवा
मालक, घरी पार्सल पाठविण्यासाठी माणसं ठेवा
सुंदर विक एंड चा सोमवारीचं सुरू होतो विचार
शनिवार रविवारला तर येतो जत्रेचा आकार
वाईन शॉप मालकांची आहे म्हणे मागणी
तीर्थ वाटपाच्या पुण्यात मिळावी अर्धी वाटणी
हुशार होता एक स्टार्ट अप व्यावसायिक खरा
केला तेथे सुरू इंग्लिश स्पिकिंगचा क्लास न्यारा
वाढत चं जात होती दिवसेंदिवस तळीरामांची गर्दी
आटोक्यात आणण्यासाठी ठेवावी लागली वर्दी
विश्वास बीडकर .
शुभ बुधवार .
१८ जानेवारी २०२३ .