इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात वेबसाईटस् पहायला मिळतात. त्यातील शास्त्रीय कोणत्या व अशास्त्रीय कोणत्या हे निश्चित ठरवू शकत नाही. 'लिंगाची लांबी व जाडी वाढवण्यासाठी अमुक एक उपाय वापरा. अमुक एक औषध वापरा. १०० टक्के परिणाम दिसेल. अशा फसव्या जाहिराती या वेबसाईटवर असतात. मुळात इंटरनेटवरील वेबसाईटवर कोणाचेही बंधन नसते. त्यामुळे कोणीही वेबसाईट बनवून वाटेल ती माहिती प्रकाशित करू शकतो. ती खरी आहे का हे पडताळणे म्हणूनच गरजेचे आहे.
लिंगाच्या मुळाशी काही 'Ligamemts' असतात. शस्त्रक्रिया करून ती कापल्यास लिंगाची लांबी वाढल्यासारखी वाटते. पण प्रत्यक्षात तसे नसते तर तो दृष्टीभ्रम असतो. शिवाय लिंग ताठरल्यावर संबंध करताना बंध तुटल्याने लिंगाचा योनीप्रवेश काहीना व्यवस्थित होत नाही व लिंगाला इजा होण्याची शक्यता असते. दुसऱ्या पद्धतीत शरीराच्या दुसऱ्या भागातून चरबी काढून ती लिंगामध्ये इंजेक्शनद्वारे देतात त्यामुळे लिंगाची जाडी वाढल्यासारखी दिसते. पण ही चरबी काही दिवसात आत शोषली जाऊन लिंगाला वेडावाकडा आकार येऊ शकतो. थोडक्यात या दोन्ही पद्धती बेभरवश्याच्या आहेत. यावर विश्वास ठेवू नये. उद्दीपित अवस्थेत लिंगाची लांबी ५ सेंमी पेक्षा जास्त असल्यास संभोग व्यवस्थित होऊ शकतात. कोणतीही अडचण येत नाही.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)