... एकादशी म्हणलं कि ऊपवास आठवतो. खर तर ऊपवास म्हणजे ज्यांचा वास परमेश्वराजवळ. ऊप म्हणजे जवळ. वास म्हणजे राहणे. शब्दशा अर्थ घ्यायचा नसून एकादशी निमित्याने काया वाचा मने परमेश्वरा जवळ राहणे.
महाराष्ट्रात वारकर्यांचि परंपरा. वारकर्याच आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा "पांडुरंग" *.. 'विठोबा. विठेवरी ऊभा. सावळा हरी विटेवरी. असा माझा पांडुरंग. हा सावळा विठोबा वारकर्याच दैवत. वारकरी आषाढी कार्तिकी आपल्या आवडत्या विठोबाच्या दर्शनासी पंढरपूरला जातात. विटेवरी साक्षात विठोबा यूगे अठ्ठावीस. कर कटेवर ठेवूनिया भक्तासाठी तिष्ठत आहे. वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेवून धन्य धन्य होतात. विठुचा गजर. हरीनामाचा झेंडा रोवियला. ही भगवी पताका वारकर्यानी खांद्यावर मिरवली. हरिनामाचा गजर करीत. टाळ मृदंगाचि दिंडी पायी मजल दरमजल करीत वारकर्याची दिंडी पंढरीत पोहचली. चंद्रभागे स्नान करून मस्तकी टिळा लाऊन प्रभाती नामस्मरण करीत.... असे हे वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेऊन जीवनी धन्य धन्य होतात.
बहू सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. ही पंढरपुरी विठ्ठल दर्शनाची आवड पुर्ण होणे . म्हणजेच जीवनी कृतकृत्य होणे होय.
जास्त वारकर्यांची संख्या ही महाराष्ट्रात दिसून येते. वारकरी संप्रदाय आणि पंढरीचा विठोबा यांच अन्योन्य नात.
*"देवाचिये" द्वारी. "* ऊभे क्षणभरी तेणे मुक्ती चारी. साधियेल्या. '.
तर असा हा विठ्ठल जीवनी आकळावा. मुखी पांडूरंगाचे नाम घेऊन जीवनी धन्य व्हावे. का? तर कलियुगात नाम हे तारक आहे. तर हे तारक नाम कलियूगी घेऊन जगी धन्य धन्य व्हावं ईतकच सांगणं
बोलावा विठ्ठल. पाहावा विठ्ठल.
🌺🌼🌸🌼🌺