आपल्याकडे असे मानले जाते की पुरुषांनाच कामवासना असतात आणि स्त्रियांनी त्या भगवयाच्या असतात. या दृष्टिकोनामुळे स्त्रिया आपली आवड निवड जाहीर करत नाही. माझ्या कडे अशा केसेस येतात की बायकोने थोडा पुढाकार घेतला तरी नवऱ्याला कॉम्प्लेक्स येतो. त्याला वाटते की हिला कामवासना आहेत म्हणजे ही शुद्ध नाही नक्कीच हीची इतर पुरुषासोबत लफडी असणार. अशा समजुतीमुळे अनेक गैरसमज मनात रुजत जातात. एखादा पुरुष देखील वेश्या असतो हे गुपित राहिलेले नाही. इतर पुरुष अशा पुरुषांच्या आयुष्याबद्दल स्वप्ने रंगवत असतात.
ज्यावेळेस माझ्याकडे काऊंसीलिंग साठी एक जिगेलो येणार आहे असे कळले तेव्हा माझ्या मनात एक उंचापुरा, सिक्स पॅक वाला तरुण असणार अशी प्रतिमा निर्माण झाली होती. प्रत्यक्षात त्याला पाहताच माझा भ्रम निरास झाला. आपल्याला वाटत असते की प्रचंड कामेच्छा असणाऱ्या स्त्रियांना असे body builder तरुण आवडत असणार. परंतु माझ्यासमोर बसलेला व्यक्ती वयाच्या चाळिशीत आणि अगदी इतर कोणताही नोकरदार व्यक्ती वाटेल असा सर्वसामान्य दिसत होता.
इतके सुख भोगणाऱ्या व्यक्तीला काय समस्या असेल असे मनात वाटून गेले. परंतु लगेचच मी त्या विचाराला बाजूला सारून psychologist च्या भूमिकेत शिरलो.
"मी जवळ जवळ वीस वर्षे हे काम करतो आहे. सुरुवातीला उलटं कमी स्त्रिया असायच्या परंतु या वयात जास्त स्त्रिया संपर्कात असतात"
"नेमकी काय अडचण आहे? हे काम आवडत नाही का"
" या कामावर ते माझे पोट चालते. कोठेही काम केले असते तरी मनाविरुद्ध वागावे लागले असते ना?" त्यानेच उलट प्रश्न केला. अडचण कामाची नाहीये ते तर त्यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत.".
हल्लीच एक मित्राची बायको त्याच्याकडे गिऱ्हाईक म्हणून आली होती. ती त्याची कॉलेजच्या वेळची मैत्रीण होती. मित्रासोबत तिचे प्रेमसंबंध त्याला माहित होते . त्यांच्या लग्नाच्या वेळेस यानेच पुढाकार घेतला होता. तिला अचानक अशा प्रकारे भेटण्याने त्याला धक्का बसला. पहिल्या भेटीच्या वेळेस तिच्याबरोबर मनसोक्त गप्पा झाल्या. एका बाजूला मित्राशी प्रतारणा करत असल्याची अपराधी भावना आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा व्यवसाय अशी त्याची ओढाताण होत होती. परंतु त्याला हे देखील कळत होते की मित्राला नुकताच हार्ट अटॅक येवून त्यातील गुंतागुंती मुळे तो बिछान्याला खिळला आहे.
तिचे म्हणणे आहे की तसेही मी तुला ओळखते त्यामुळे मी तुझ्याबरोबर जास्त comfortable आहे. इतर कुणा पुरुषा सोबत जाण्यापेक्षा तूच जास्त योग्य आहेस.
स्वतःला असे काम करावे लागते त्यामुळे याने अजून लग्न केले नाही. अशा प्रसंगी मित्राच्या बायकोसोबत भावनिक संबंध प्रस्थापित होण्याची त्याला भीती वाटतेय. आपण पकडले गेलो तर मित्राला पुन्हा कसे तोंड दाखवायचे? हा विचार सारखा सारखा येतोय. त्याच बरोबर या व्यवसायात स्त्रियांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार त्याला माहित आहे.
मी त्याला पुढच्या वेळेस तिला सोबत घेवून बोलावले आहे. बघुया काय होते ते.
टीप: कृपया स्त्रिबद्दल कोणतीही वाईट कमेंट करू नये.