रात्र ही आरशासारखी असते , कारण आरशा कधीच खोटी प्रतिमा दाखवत नाही,आणि मनातील भाव अगदी स्पष्टपने जसेच्या तसे चेहऱ्यावर दर्शवते.. अचानक भूतकाळातील आठवणीच ओझं वर्तमानकाळात येऊन आदळते , व रात्रीच्या या शांत अंधारामध्ये मन मात्र गोंधळ घालते.. विस्करलेल्या या वेड्या मनाला मात्र बांध घालता येत नाही , अचानक गार मंद वाऱ्याची झुळूक येते आणि सगळ्या आठवणी याच वाऱ्याबरोबर भुर्रकन उडून जातात ..आणि चेहऱ्यावर एक छोटसं हास्य येते , व भरकटलेल्या मनाला सावरते... आणि पुन्हा स्वतःला पुढे जाण्यास बळ देते ... ही रात्र अशीच असते...!
-@दत्ता बाळके