Bluepad | Bluepad
Bluepad
दशावतार...
प्रा.वैभव खानोलकर
प्रा.वैभव खानोलकर
17th Jan, 2023

Share

*✍🏻सागावेसे..वाटलं..म्हणुन*
काल एक दशावतारातील लंगार नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेहमी सारखीच त्यावर चर्चा रमली. मुळातच जर हा व्हिडिओ *दशावताराची उंची वाढवणारा नव्हता किंवा याच्यामुळे गैरसमज होणार तर हा व्हिडिओ मुळातच गृपवर का पाठवला गेला..हा पहिला प्रश्न ..आणि पाठवताना "असा लगांर मी पाहिला नाही" अशी प्रतिक्रिया का लिहिली गेली हा दुसरा प्रश्न ..*
मग काहीनी याला विंडबन म्हटले आणि चर्चा अधिकच वाढली ..
*मला विनाकारण कोणत्याही चर्चेत ना बोलायला आवडत ना भाग घ्यायला...*.
मी प्रा.वैभव खानोलकर यांपुर्वी लंगारनृत्यावर लिहिलेला शोधनिंबध राज्यात पहिला आला आणि दैनिकातुन ही लंगार नृत्यावर मी लिहिले होते त्यामुळे काही रसिकांनी मला वैयक्तिक काँल केले आणि *माझा काहिच संबध नसतात यात मला हि गुंतवले मग यावर तुमची प्रतिक्रिया काय ?असे प्रश्न विचारले आणि मी थोडसा गोंधळलो*.
या कलावंताची बाजु घ्यायची कि रसिकांना परखड पणे सागयचे काहीच कळत नव्हते म्हणुन थेट त्या कलावंताशीच बोलणे पंसत केले. फोनवर या *नृत्यातील कलावंत अत्यंत नम्रमणे माझ्या सोबत बोलले.त्याची नम्रता आणि त्यांचे दशावतारचे विंडबन न करण्याचा हेतु माझ्या लक्षात आला..आणि ह्या प्रकरणावर मी माझ्याकडून पडदा टाकला*. कदाचित ह्या एका व्हिडिओने दशावताराचे विंडबन होवु शकत नाही किंबहुना अशा काही गोष्टी आज होताना दिसतात ज्या या लोककलेला मारक आहेत.
*आज विंडबन हा शब्द दशावतारात खुपच वेळा दिसतो,आणतो आणि तो येतो हि..
*याच विंडबनाचा शोध घेण्यायासाठीचा हा वेळ फुकट घालवुन केलेला उपद्याप...*
खर तर लोककला ही लोकांनी लोकाच्या मनोरंजनासाठी केलेली असते मुळातच ती रसिकांची ठेव असते आणि ती रसिक जगतात आणि ते कोणीच नाकारु शकत नाही.हि आपली 800 वर्षाची पंरपरा आहे.
*20-20 डबल बारीत दशावतार लोककलेचे विंडबन झाले आणि दशावतारात विंडबन शब्दाने प्रवेश केला*
..खर तर भजन आणि दशावतार ह्या दोन्ही ही लोककला आहेत एका लोककलावंताने दुसऱ्या लोककलेचे विंडबन करणे हे कलावंत म्हणुन शोभनिय नाही आणि त्याचा मी एक रसिक म्हणून आजही निषेध करतो
*यावेळी काही दशावतारी कलावंत आणि दशावतार प्रेमी एकत्र आले आणि हे हिन प्रकार रोखण्याचा कौतुकास्पद प्रयत्न ही झाला* हि बाब निश्चितच मला रसिक म्हणुन अभिमानास्पद आहे.
पण त्यानंतर हे विंडबन रोखणा-या काही दशावतार कलावंतानी आणि दशावतार रसिकांनी केवळ आणि केवळ दशावतार ही आपलीच मक्तेदारी आहे असा गोड समज घेतला..आणि दशावताराच्या विंडबन नाटकाला सुरवात झाली.कोरोना काळात एका शाळेत क्वारटाईन केलेल्या युवकांनी लंगार नृत्य केले त्यावर आक्षेप नोंदवला गेला.
आक्षेप काय असेल तर त्यांनी लंगारनृत्य करताना हाताला सँनिटायझर लावले आणि विंडबन केले जे दशावतारात बसत नाही..खर तर ते या लोककलेचा आस्वाद घेत होते..कोरोना काळातही दशावतार त्याना नवीन उमेद देत होते हे या आक्षेप घेणाऱ्याना का दिसले नाही ?
सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक सन्मा.मयुरजी गवळी याच्या लंगारनृत्यावरील गाण्यावर तरुणाई बेभान नांचली त्यांना ती ठिकाणे वेगवेगळी होती कोण लग्नातील हळदीला,कोणा कधी क्रिकेटची मैदानात,तर कोण अगदी क्रिकेटच्या पीचवर ही नाचला..या वर रसिक राजा थांबला नाही तर
*मोबाईल टाँन म्हणुनही हे गाणे वापरले डिजे वर लावले गेले हा लोककलेचा आणि त्या लोककलावंताचा गौरव नाही का*?
मग स्वताःत दशावताराचे स्वयःघोषित पुजक मानलेल्या या मक्तेदारी असणाऱ्या मंडळी कडून अनेकदा ट्रोल करण्याचा निषेधाजनक प्रकार योग्य होता..का?
एका युवतीने ही याच गाण्यावर घरात आपण केलेले लंगार नृत्य सोशल मिडियवर प्रसारित केले आणि तीला हि ट्रोल करण्याचा तिला व्हिडिओ काढुन टाकण्यासाठी वारंवार संदेश पाठवले जाऊ लांगले हे आपल्या सभ्य संस्कृतीत बसते का?
खर तर मयुरजी गवळीना सुध्दा काही मक्तेदारी घेतलेल्या लोकांनी त्रास दिला माझ्या सारख्या सामान्य रसिकाला प्रश्न पडतो...
नेमके दशावतार लोककलेवर काही कलावंत आणि काही स्वयःघोषित पुजक मक्तेदारी तर दाखवत नाही ना?
*नेमके यांना विंडबन म्हणजे काय ते तरी कळत ना!*
*कारण विंडबन हा सहज कोणालाही कळवा इतका साधा विषय नाही त्याला वैचारिक अधिष्ठान आहे आणि हे विंडबन साहित्यातही रसिक मान्य आहे.*
विंडबन या शब्दाचा साहित्यात अर्थ *उपहासात्मक केलेली टिका यामध्ये समोरच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेवुन केलेले साहित्यकृती..*
मग दशावतारी संवाद,लंगार नृत्या यांचे विंडबन होते अशी ओरड मारली जाते ते खरच विंडबन होवु शकते का?
हा प्रश्न संशोधनाचा विषय होवु शकतो कारण *आपल्याला जर गैरसमज करुन एखाद्या ला अडचणीच आणायचे असेल आपण कोणतेही कारण पुढे करुन हे विंडबनच आहे म्हणुन ते सिध्द ही करु शकतो..*
दुर्दैवाने तसे दशावतार लोककलेच्या..बाबत बोलायचे झाल्यास रसिकाच्या भावनाचा,त्याच्या रसिकतेचा चुराडा या मक्तेदारांनी केला गेला...
विंडबन म्हणजे नेमके काय हे न सागताच दशावतारी गाण्याचे व्हिडिओ ,नृत्य यावर प्रसार माध्यमातून प्रसरवण्यावर बंदी केली गेली.
*पण या जर एकादा व्हिडिओ या मक्तेदारांनी किंवा त्याच्या समर्थकांनी पाठवला ते विंडबन कसे नाही याबद्दल पाठराखणही केली गेली,*
म्हणजेच दशावतार रसिकांसाठी न राहात ती कोणाची तरी मक्तेदारी बनु पाहातेय..यांची प्रामुख्याने मला जाणीव झाली.
काही निंदनीय प्रकार याच व्हिडिओ च्या माध्यमातुन काही रसिकांनी हि केले दशावतारातील प्रसंग, नृत्यातुन दशावताराला टिक-टाँक,सारख्या माध्यमावर बदनाम केले हे हि मी मान्य करतो..जर खरच चुकिचे होते (उदा.शृगार रसाच्या सिनला हिंदी गाणे लावणे,काहीतरी बिभित्स,करणे आणि दशावतार संगित लावणे इं) जे खरचे शोभनिय नाही त्याला विरोध झालाच पाहिजे.आणि त्याचा निशेष ही केला पाहिजे.
पण सर्व रसिक विंडबन करत नव्हते .तरी ही दशावाताराची नक्कल,त्यांनी केलेले लंगार विंडबनाच्या नावाखाली राजरोस पणे बंद केले जाऊ लागले.
*एका सलुन मधील युवकाने एका गिऱ्हाईकाची दाढी करत असताना भाव अंतरीचे हळवे या नृत्यावर तो नाचत होता ..अगदी त्याला ही मिडीया समोर दशावतार स्वतःची मक्तेदारी मानलेल्या लोकांनी माफीनामा सादर करायला लावला..जी गोष्टी दशावताराचा पुरक नाही..*
माझा रसिक म्हणुन प्रश्न आहे सगळ्याच
*दशावतारी कलावंताना तुम्ही कधीतरी विचार करा! हे चाललेय ते खरच योग्य आहे?*
*लोककला नेमकी कुणासाठी आहे*
रंगभुमीवर काही कलावंत भुमिका साकारताना विंडबन केल्याने अनेक व्हिडिओ मी पुरावा म्हणून आपणस देवु शकतो.ज्या रंगभुमीवर गणेशाचे स्तवन कलावंत करतात तिथे कमरेखालचे (अश्लिल) बोलणे हा प्रकार कितपत स्वागतार्ह आहे. तुमच्या माता भगिनी समोर बसलेल्या असतात याचे भान किती कलावंताना किती असते?
*या विंडबना बाबत हे मक्तेदारी असणारे स्वयः घोषीत दशावतारी पुजक मुग गिळून गप्प का असतात?..मग कुठे जाते तुमची निष्ठा आणि दशावतार प्रेम?*
आणि वर रसिकांना तेच हवे असा युक्तिवाद ही काही कलावंत कडून केला जातो जो तुमच्यातल्या कलावंताला शोभनीय नाही..
कि तुम्हाला काहीही करण्याची मुभा आहे?
रंगमचावर काही अश्लिल हालचाली ही केल्या जातात (कंबर हलवणे,दांडा पायात घालणे,विशिष्ट इशारे करण) हे कोणत्या पुराणात,नाट्य शास्त्रत बसते?
*लोकराजा सुधीर कलिंगण यांनी वेडा चंदन साकारला पण तो अभिनयातुन जो आजही लोंकावर प्रभाव टाकतोय,पप्पू नादोसकर यांचे संवाद लोकांना ऐकावेसे वाटतात,दत्तप्रसाद शेणईची वाक् चातुर्य मनाला स्पर्श करते ,पुरूषोत्तम खेडेकर यांची भाषाशैली नाटकात रंग भरते,सुधीर तांडेल याचे स्त्रीपात्र संघर्ष करताना टाळ्या घेते..प्रशांत मेस्त्रानी साकारलेली कारुण्यरसातील भुमिका डोळ्याच्या कडा ओल्या करतात...बाबा मयेकर यांनी साकारलेले बादशहा त्याच्या हिंदी भाषेवरील प्रभुत्वाचे दर्शन देते...उदय राणेचा कर्ण लोंकांना विचार करायला भाग पाडतो..दादा राणे कोनसकर यांचे लंगार नृत्य उंची गाठते..तुकाराम (अण्णा) गावडेचा खलनायक धडकी भरवतो,हरिचंद्र गावकर यांचा रेवणनाथ आजही नममस्तक होवून स्विकारला जातो,मास्टर दामु जोशी हे खलनायकीचे हास्य ..रसिकांच्या काळजाचे पाणी पाणी करते ,उदयमुख कलावंताला नितीन आसयेकर आपल्या प्रभावी सादरी करणाने लोकमान्य होतात ..अनिल घावनळकर कांकानी साकरलेली विनोदी पात्र अश्लिल न बोलता ही मोठ्या ताकदीचे विनोद निर्माण करते ... पप्पु घाडीगावकर यांचे ..सुर निरागस गाणे परत परत ऐकावेसे वाटते.. मयुर गवळीचे भाव अंतरीचे गाणे लोकांना बेभान करते..विनायक सावंताचे झांजवादनाने लोक डोलु लागतात..बाबा मेस्त्रीची मृंदुगावरची थाप अंगावर शहारे आणते..स्व.नेरूरकर यांचे गायन आणि वादन आजही रसिक आठवतात.. मग इतके आदर्श असताना ...
काही कलावंताना आपल्या भुमिकाचे भान का नसते?का अश्लिल बोलावेसे वाटते?या विंडबना बद्दल का दशावतारी पुजक आवाज उठवत?
खर तर दशावताराचा
स्तर घसरतोच कसा?
*मग विंडबन विंडबन म्हणुन रसिकांना लगाम घालणारे हे मक्तेदार जातात कुठे?*
रसिकांना काय हवे हे तुम्ही ठरवु नका कारण तुमच्या कडून आपल्या वैचारिक कुवती प्रमाणे अपेक्षा करणारे काहीच रसिक असु शकतात पण इतरांकडून ही तुमच्या अपेक्षा आहेत त्याचे काय? *तुम्ही रसिकांना चांगले द्या स्विकारतील*
दशावतार हि कोणाची मक्तेदारी नाही ती लोकांची ठेव आहे ती कलावंत म्हणुन आपण जपता याबद्दल मी आपले स्वागत ही आणि आभार ही मानतो.
*प्रजासत्ताक दिनी आपल्या जिल्ह्यातील कळसुत्री बाहुल्याचा खेळ करणारे आद.गगावणे काकाना पद्श्री जाहिर झाला आणि या जिल्हाचा नागरिक म्हणुन मला ही आनंद झाला* पण माझी लोककला दशावतार या पुरस्काराने कधी सन्मानीत होईल?..
स्व.बाबी नांलग नंतर कोणीच राष्ट्रपती पुरस्कारापर्यत जाऊ शकला नाही..
आपण लोककलेचे प्रसारक आणि प्रचारक मानणाऱ्या लोंकानी या गोष्टीचा विचार करा..रसिकांना धारेवर धरण्यापेक्षा कलावंताच्या भुमिका त्यांची कामगिरी कशी उंचावले लोककलेला पोषक वातावरण मिळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते बघा
*whatapp ,face book दशावतार मोठे करण्याचा प्रयत्न करण्याना सागावेसे वाटते* जेव्हा जे काहिच नव्हते..अगदी लाईट ही नव्हती तेव्हा ही हा लोककलावंत चमकत होता आणि आताही चमकतो..आणि उद्या ही चमकेल..
*तुमच्या whattapp आणि face book च्या कुंबड्याची त्याला गरज नाही*..गरज आहे ती फक्त मायबाप रसिकांची
*ज्या रसिकांचे माफीनामे आपण घेताय आणि मोठेपणाचा ठेंभा मिरवताय तेच रसिक दशावतार जपतात हे विसरु नका?*
आणि रसिक काय करु शकतात हे मी सागण्या इतपत आपण नक्कीच अज्ञानी नाही....
(अभिव्यक्ती स्वतंत्र मला सविधानाने दिलेला अधिकार आहे..माझ्या लिखाणा विरुध्द कोणालाही आक्षेप असेल तर मी अगदी न्यायालयीन लढाई ही करायला तयार आहे..)
*प्रा.वैभव खानोलकर*
( वरिल मजकूरात कोणी बदल करण्याचा प्रयत्न कोणी केला तर काँपी राईट नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल..
*प्रा.वैभव खानोलकर संपर्क -9420307057/9028407057*)

189 

Share


प्रा.वैभव खानोलकर
Written by
प्रा.वैभव खानोलकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad