Bluepad | Bluepad
Bluepad
दशावतार
प्रा.वैभव खानोलकर
प्रा.वैभव खानोलकर
17th Jan, 2023

Share

*दशावतार संस्कृती कि विकृती?*
आठशे वर्ष पंरपरा असलेली लोककलेबद्दल कदाचित दशावतार संस्कृती कि विकृतीचे ?असा प्रश्न विचारणे तुम्हाला रसिक म्हणुन वा दशावतारी कलावंत म्हणुन ही अयोग्यही वाटेल ही, पण कधीकधी विकृत मनोवृत्तीच्या माणसामुळे असे प्रश्न येतात ज्याच्या उत्तराचा परिघ हा संपता संपत नाही..
मुळातच कलावंत स्वतःचा कलावंताचा पिंड जेव्हा गहाण टाकतो तेव्हाच *पप्पी दे पप्पी दे अशी अर्थहिन गाणी रंगमंचावर रंगतात, ब्राम्हणाची भुमिका करणाऱ्या कलावंताच्या दोन पायाच्या मध्ये हलणारी काठी बघुन काही आंबटशौकीन रसिकाकडून शंभर दोनशे रुपये ही जमा ही करता येतात याच बरोबर अचकट विचकट हाव भाव करुन कंबर ही हलवण्यातही काही कलावंत धन्यता मानतात आणि भुमिका साकारताना रंगमंचावरच्या अलिखित मर्यादा मोडून समोरील रसिक वर्गात बसलेल्या एखाद्या निरागस बालकापासुन ते दारु पिऊन बेभान असणाऱ्या दारुड्या सोबतही एखादा लौकिक प्राप्त कलावंत जेव्हा रंगमचावरच धिंगाणा घालताना दिसतो तर कधी काही कलाव़त भुमिका साकारताना स्वतः च दारु च्या आहारी जाऊन स्वतः च्या भुमिके बरोबरच सहकलावंताच्या भुमिकेचा चुराडा करुन आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन करत दशावताराला बदनाम करताना टाळ्या आणि शिट्या घेत आपण करतो ते जणु काही अलौकिक आहे आभास बनवतात आणि हे सगळे करुनही मन भरत नाही म्हणुन कि काय !सगळ्या सिमा, मर्यादा,आणि बंधने झुगारुन देत भर रंगमचावर रसिकांना लज्जास्पद वाटेल असे महिषासुर मर्दिनी नाटकातील खलनायक आणि स्त्री भुमिका साकारणा-या कलावंताचा विकृत आणि बिभित्स प्रकार बघुन दशावतार हा प्रबोधनाचा नाही तर विकृतीचा बाजार आहे याची खात्री पटते* आणि याच विषयावर अनेक खलबत्ते रंगतात.
मग नेहमी सारखे काही कलावंताकडून "जे रसिकांना हवे तेच आम्ही देतो"असा युक्तीवाद केला जातो पण नेहमी सारखा एक प्रश्न परत शिल्लक राहातो
*दशावतार संस्कृती नेमकी प्रबोधनासाठी कि विकृतीसाठी*?
दशावतार ही सहाव्या शतकात जन्माला आलेली सगळ्यात जुनी लोककला जी आजच्या 4G च्या जमान्यातही अजुन जनमाणसात तितकिच लोकप्रिय आहे.या लोकप्रियतेचे एक कारण असे सागता येईल ती म्हणजे *हि लोककला कोणत्याही वयोगटाचा माणुस बिनधास्तपणे अगदी आपल्या बायका मुला समवेत चारचौघात बसुन बघु शकतो* पण याच लोककलेच्या यशस्वीतेला आज सुंरुग लावण्याचे काम काही विकृत माणसाकडून वारंवार होताना दिसते *"मी विकृत माणुस हा शब्द या ठिकाणी मुद्दाम वापरला कारण कलावंत हे विकृत नसतात"* त्यांचा पिंड हा मुळातच प्रबोधनाचा असतो आणि दशावतार लोककलेत आताच्या ही तो तसाच दिसतो.
*प्रबोधन हा दशावतार लोककलेचा आत्मा आहे आणि त्यामुळे दशावतार हि एकमेव लोककला अशी आहे जिचा संबध थेट कोकणातील गाव-हाटी आणि बारा पाचची देवस्थाने याच्याशी जोडला गेला आहे.*
मुळातच कलेचा अधिष्ठाता गणेश हाच या कलेच्या निर्मिताचा आधार मानला गेल्याचे दिसते म्हणुनच गणेश आवाहन करुनच नाटकाची सुरवात आजही होताना दिसते.
दशावतार कलेत आज जवळपास सगळेच सुशिक्षित कलावंत आहे ही पण पुर्वी अशिक्षित कलावंतानी साकारलेल्या भुमिका आणि केलेले अभिनयाच्या गोष्टी आजच्या घडीला ही सर्वोत्तम वाटतात आणि अनेक जुनेजाणते लोक त्या अशिक्षित कलावंताच्या सुंदर अभिनय आणि संवाद चे कौतुक करताना आजही दिसतात.
अशिक्षित कलावंत सहिता नसताना उत्तम संवाद सह अभिनय साकारायचे
*आम्ही तोंडाला रंग लावला कि रंगदेवता हे आपसुक घडवायची असे विश्वासपूर्ण आणि श्रध्दापूर्वक कलावंत आजही सागतात*.
एकदा तोंडाला रंग लावुन *सभेत गेलो कि पुराणातील दाखल्या पासुन व्यवहारीक बाजुने तात्विक संघर्ष करताना ह्या रंगदेवतेच्या कृपाप्रसादाची खात्री रसिकांनाही पटायची आणि मग या अनामिक शक्ती समोर सामान्या लोकही नतमस्तक व्हायचे*. ..
आज ही "सहिता नसणारे नाट्य म्हणजे दशावतार" हे नाट्यक्षेत्रासाठी एक विलक्षण अभिमानाचा विषय आहे म्हणुन *प्रबोधनासाठी १३ व्या शतकातही याच दशावतार लोककलेचा वापर केल्या गेल्याचे पुरावे संत रामदासाच्या ग्रंथ संपदेत मिळतात याच बरोबर स्वातंत्र्य पुर्व काळात दशावतार लोककलेने भारतीय लोकाच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात रणशिंग फुकल्यांचे दाखले गोवा आणि कोकण प्रांताचा इतिहास देतो* थोडक्यात काय तर *प्रबोधनाचा धागा पकडून जनमाणसाला न्याय निती धर्म आणि सदाचाराची शिकवण देणारी लोककला आज विकृतीकडे वळतेच कशी?*
काही कलावंतामुळे जर दशावतार लोककलेचा *आत्मा दुषित होत असेल आणि काही कलावंत आणि आंबटशौकिन जर याला खतपाणी घालत असतील तर तुम्हाला वेळीच सावध होणे काळाची गरज आहे*
हे सगळे मांडायची गरज आज वाटली त्याचे विविध कारणे आहेत!
मागे एकदा असाच व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल झाला यात एक भुमिका करणारा कलावंत दारुच्या नशेत भुमिका साकारताना अक्षरशः रंगमंचावर पडत होता खरतर ही गोष्ट अत्यंत खेदजनक होती पण हा व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केला त्याला माफीनामे सादर करण्यासाठी अनेक लोककलावंत सह काही रसिकांनी कबंर कसली होती जर *एखादा लोककलावंत दारु पिऊन,बिभित्स हावभाव करुन अश्लिल चाळे करुन अभिनय करुन दशावतार कलेची बदनाम करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करत असेल आणि काही कलावंत आणि रसिक जर पाठिशी घालुन व्हिडिओ व्हायरल करण्याला जाब विचारत असतील तर दारु पिणा-या कलावंता वा बिभित्स हावभाव करणाऱ्या आणि त्याची बाजु घेणाऱ्या कलावंत आणि रसिकांची ही मनस्थितीची तपासणी करणे गरजेचे आहे*
कारण हि लोककला कोणाची *वैयक्तिक मालमत्ता नाही कलावंत जरा ही लोककला जपत असतील तर समाज त्याचे सवर्धन करतो आणि लोककलेचा पुजक वा उपासक म्हणुन अशा हिन प्रकाराला विरोध करणे अथवा त्या विरोधात बोलण्याचा अधिकार समाजातील प्रत्येक सुजाण रसिकास आहे*.
आज काही रसिक आपली सद् विवेक बुध्दी गहाण टाकुन कोणताही विचार न करता काही किळसवाणे व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करताना दिसतात अलिकडे अशाच एका दशावतार नाटक
महिषासुर मर्दीनी सारख्या पौराणिक नाटकाचे बिभित्स दृश्य सोशल मिडीयावर अपलोड केले गेले या नाटकातील *तो बिभित्स अभिनय करणारे खलनायक आणि स्त्री भुमिका साकारणारे कलावंत यांच्या सह तो व्हिडिओ सोशल मिडियवर अपलोड करणाऱ्या माणसाला नेमके*
*या व्हिडिओतुन काय साध्य करायचे होते यांचे चिंतन त्या संबंधित कलावंता सह त्या* *अपलोड करणाऱ्या*
*यु-टूब चँनलने करणे गरजेचे आहे*
आपण सोशल साईटवर एखादा लोककलेचा प्रसंगाचा व्हिडिओ अपलोड करताना या व्हिडिओतुन दशावताराला बाधा तर येणार नाही ना याचा विचार एकदातरी अपलोड करणारे व्यक्ती सोबतच अभिनय करणाऱ्या लोककलावंतानी केलाच पाहिजे कारण आज प्रसार माध्यमाचा अतिरेकी वापरामुळे तुमचा अप्रतिम अभिनय वा बिभित्स जाळे जगभरात दिसतात.तुम्ही भुमिका साकारताना अनेक मोबाईल तुमच्यावर खिळलेले असतात
अशा बिभित्स प्रकारामुळे *आया बहिणीच्या समोर खुले आम पणे बघितली जाणारी ही लोककला चार बंद भितींत बघण्याची वेळ या काही कलावंतामुळे यायला जास्त वेळ लागणार नाही* म्हणुनच रसिकासह दशावतार चालक मालक यांनी ही आपले कलावंत नेमके सादरीकरण करताना कोणती भाषा वापरतात अभिनय करताना नेमके काय करतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे
*पुर्वी दशावतारात मालक मंडळी इतकी शिस्तप्रिय आणि संस्कारी होती कि दशावतार लोककलावंत त्याच्या या शिस्तीला घाबरुन कलावंत मर्यादित भुमिका करायचे त्यामुळे अगदी काळोखातही दशावताराची नाटकाची प्रभा सुर्याला हि लाजवायची आज विजेचा झगमगात आला पण दशावताराची प्रभा कुठेतरी बिघडली.*
*विकृत हावभाव अचकट विचकट बोलणे,अश्लिल बोलणे आणि बिभित्स कृतीनी बरबटले अभिनय यातुन दशावतार संस्कृती नाही तर विकृती आहे असे चित्र आणि गप्पाचे अनेक किस्से रंगु लांगले*.
काही मालक आणि चालक हे नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघु लागले जणु काही मालकाचा कलावंताशी काहीच संबंध नाही असे चित्र आज काही दशावतार मंडळात दिसु लागले
आजही दशावतारात सन्मा प्रभाकर पार्सेकर,स्वर्गीय मामा माचोमाडकर यांची कलावंता सोबत असणारी शिस्त आणि सहसंबध याची अलिकडच्या काळातली उदाहरणे आपल्या समोर असताना त्याच शिस्तबध्द पध्दतीचे दशावताराचा संस्कारशिलतेच्या प्रबोधनाचा गाडा आजचे काही मालकाचा याच शिस्तबद्ध पध्दतीने कलावंतावर वचक ठेवुन चालवण्याचा प्रयत्न करताना दिसतात,पण काही मालकाचा कलावंतावर असणारा अति विश्वास आणि प्रेमापोटी आपल्या कलावंत असणारा वचक कुठेतरी कमी झाल्याचे दिसते परिणामी आम्ही करु तेच खरे यातुनच दशावतारी प्रबोधन विकृतीने बरबटले जाते आणि आज हे वेळीच रोखणे गरजेचे आहे.
अन्यथा अशा विकृतीला तुमचे दशावतार मंडळासह संबधीत मालकही तितकाच जबाबदार असेल
आज अशा विकृती विरुध्द रसिकांनी आक्षेप घेतला तर काही कलावंता सह काही रसिक आक्षेप घेण-याच्या भावना त्याचे मत विचारात न घेता त्याला माफीनाम्या साठी त्रास दिला गेला आणि आजही दिला जातो पण यातुन साध्य काय झाले तर कलावंताचे मन इतके बेडर बनले कि कलावंत बेभान होवुन कलेसाठी नाही तर अपण काही आंबट शौकीनासाठी अभिनय करु लागले आणि अचकट विचकट बोलण्या सोबतच अश्लिल दृश्य आया-बहिनी समोर साकारु लागले *महिषासुर मर्दिना नाटकातील हिन अभीनय आणि बिभित्स दृष्याने खलनायक आणि स्त्री कलावंताने तर दशावताराची लक्तरे अक्षरशः वेशीवर टागंली*
खरच
*"दशावतार लोककलेत हा प्रसंग विकृतपणे रंगमंचावर दाखवण्याची गरज या कलावंताना खरंच होती का?"*
कित्येक दशके दशावतारात एकाच बाकड्याचा वापर करुन कधी इंद्र दरबार कधी महाविष्णुचे वैकुंठ कधी ब्रम्हराक्षसाचे अरण्य तर कधी अंगावर शाहारे आणणारा नायक नायिकेचा निर्सगातील,शयनगृहातील
प्रणय प्रसंग हे सगळे एकाच रंगमंचावर आपल्या भाषा आणि अभिनय कौशल्याने रसिकास समोर कोणताही प्रसंग वा चित्र उभे करणारा आपला अभिनय संपन्न कलावंत आणि तितकाच व्यासंगी समजदार रसिकवर्ग लाभणा-या दशावतारात जर आपण अशी कृत्य करुन नेमके साध्य काय करायचे अशा विकृत माणसाना? अशा विकृत ,अश्लिल हालचाली वा भाषा वापरुन जर काही कलाकार लोककलेला बदनाम करत असतील तर सातासमुद्रापार गेलेली लोककला दशावतार बद्दल लोक विचारतील *"ह्याच का ता तुमचा दशावतार*"
*प्रबोधनाचा काय विकृतीचा*,? ..
आणि दशावताराचे गुणगान गाणा-या तमाम रसिकासह या लोककलेचे गोडवे गाणा-या कोकणभुमिचा अन् ख-या खु-या लोककला जपणा-या लोककलावंताचा तो लाजणीरवाणा अवमान असेल..आणि याला फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतपत काही बेजबाबदार कलावंत आहेत मालक जबाबदार असतील.
*(सदरचा लेख हा सविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरुन लिहिला गेला आहे सदर लेखावर जर कोणत्याही कलावंतासह रसिकांना आक्षेप असल्यास न्यायालयीन लढा देऊन माझ्या जवळ असणारे व्हिडिओ आणि फोटो मी न्यायालयात सादर करु शकतो.*
*कोणावर टिका करणे हा लेखाचा हेतु नाही*
*जर यात लेखात बदल करुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न झाल्यास copy act नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल)*
प्रा.वैभव खानोलकर
सिंधुदुर्ग
9028407057
9420307057

181 

Share


प्रा.वैभव खानोलकर
Written by
प्रा.वैभव खानोलकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad