काल एका मित्राशी बोलता बोलता तो म्हणाला "आज काल, मी लहान सहान गोष्टींवरून लगेच भडकतो, मला लगेच राग येतो आणि अस काहीतरी बोलून जातो, की नंतर मी ते का बोललो अस दुःख होत राहतं"
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपली स्ट्रेस लेव्हल वाढत आहे, आपण वरून शांत दिसतो, सौम्य बोलतो पण आतली धगधग शांत नसते आणि एखादा विषय असा निघतो की आपण भडकतो राग कंट्रोल होत नाही. अस वारंवार होत असेल तर वेळीच सावध व्हा आपल हे वागणं आपल्यालाच त्रासदायक ठरेल
रागामध्ये आपण योग्य - अयोग्य मधला फरक विसरून जातो, बोलताना शब्दांच भान राहत नाही त्यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं प्रत्येकानेच शिकलं पाहिजे
राग नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग आहेत:
१. खोल श्वास, ध्यान आणि योग यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा.
२. राग आणणारे ट्रिगर ओळखा आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना अधिक सकारात्मक पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी योजना तयार करा.
३.नकारात्मक विचार आणि भावनांना दुरुस्त करण्यासाठी वा टाळण्यासाठी सकारात्मक आत्म-चर्चा (सेल्फ टॉक) वापरा.
४.शारीरिक व्यायाम करा, कारण ते तणाव कमी करण्यास आणि एंडोर्फिन सोडण्यास मदत करू शकतात.
५. सतत राग येत असेल आणि तो अनावर होत असेल आणि तुम्ही स्वतः वापरत असलेली तंत्र उपयोगी येत नसतील तर तज्ञ - डॉक्टर्स सोबत कन्सल्ट करा. यात काहीही चुकीचं नाही मानसोपचार तज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉक्टर हा वेडा समज सोडा आणि त्यांना भेटा.
६. माइंडफुलनेसचा सराव करा आणि वर्तमानात राहण्याचा प्रयत्न करा, भविष्याबद्दल विचार आणि भूतकाळातील गोष्टी तुम्हाला अजून त्रास देऊ शकतात.
७. इतरांना समजून घेण्याचा आणि सहानुभूतीचा प्रयत्न करा.
८.जवळच्या व्यक्तीशी आपल्या भावना व्यक्त करा.
९. विश्रांती घ्या, आराम हा फक्त शारीरिक नसतो मानसिक सुधा असतो, झोप शरीर आणि मानसिक आराम देते.
१०. क्षमा करण्याचा सराव करा आणि राग सोडून द्या. इतरांबद्दल केलेला राग - राग त्या व्यक्तीला काहीच त्रास देत नाही पण तुम्हाला स्वतःला खूप त्रास देतो हे विसरू नका.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की राग नियंत्रित करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते आणि ही एक प्रक्रिया आहे ज्यासाठी संयम आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक आहे.