Bluepad | Bluepad
Bluepad
दुरावा
Swapnil Bhovad
Swapnil Bhovad
17th Jan, 2023

Share

कधी न संपणारा दुरावा एकदिवस नात्यात मोठी दरी निर्माण करतो.
जस-जशी वेळ निघून जाते , तस-तस त्याची खोली वाढते.
आकर्षण - जवळीक - प्रेम ह्यातील ऊर्जा हळूहळू कमी होते.
संवाद निरस होतो. सुरुवातीला सुचणारे अदाकारी शब्द कुठेतरी लपून बसतात . त्यांचा शोध घेतला तरीही ते जवळ फिरकत नाही.
त्या नात्याला तडा बसतो.
मग शोध सुरू होतो नाविन्यपूर्ण सुखाचा....कोणीतरी दुसरं तुमची जागा घेत. संशय ,वाद , न मिळणारा वेळ ह्यामुळे कधीच न भरून येणारी पोकळी वाढत जाते.
मन सुन्न होत....विचलित होत....आठवणीने कासावीस होत...
आकर्षणाचे आवरण पुसून जात...आणि सुरू होतो .
"दुरावा"
#स्वप्नाळू🔥✒️

190 

Share


Swapnil Bhovad
Written by
Swapnil Bhovad

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad