Bluepad | Bluepad
Bluepad
नाती जपणे हिच श्रीमंती
7367
7367
17th Jan, 2023

Share

✍️ या जगात घड्याळ स्वस्त आहे. पण वेळ महाग आहे सुंदर रूप स्वस्त आहे पण चारित्र्य महाग आहे शरीर स्वस्त आहे पण जीवन महाग आहे नाते स्वस्त आहे पण टिकवणे महाग आहे माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते तर ते चांगल्या विचारावर असते कारण आधार कायम सोबत नसतो पण चांगले विचार कायम बरोबर राहतात कुटुंबासाठी भाकरी कमवणे खुप मोठी गोष्ट नाही पण कमवलेली भाकरी कुटुंबांसोबत एकत्र बसून खाणे ही खुप मोठी गोष्ट आहे यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही एकमेकांसाठी जगणे यालाच जीवन म्हणतात म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात मातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो तस शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोड़ा पण जवळची माणसं तोडू नका कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी शब्दांतही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे नात म्हणजे काय ते कोणाच्याही सांगण्यावरुन जुळू नये आणि कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोड झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगुन लहान राहीलेले कधीही चांगलं जिवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून आनंद देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या विश्वासांवर स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं नात ते टीकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजुन तरी सुरु झालेली नाही म्हणून नाती जपा आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात पण न बोलवता दु:खात जे सामील होतात तेच खरे आपले असतात प्रेम आणि विश्वास कधीच गमावु नका कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर*
*ठेवता येत नाही

163 

Share


7367
Written by
7367

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad