Bluepad | Bluepad
Bluepad
👩"स्त्री शक्ती आणी समाज,"
laxman shingre
laxman shingre
17th Jan, 2023

Share

  1. नव चैतन्यांची शलाका आहे नारी,!
  2. नव निर्मितीचा मूळ स्रोत आहे नारी,!
  3. भक्तीची परा काष्ठा अन,प्रेमाची वाहती धारा,!
  4. तुझ्यावरच आधारीत आहे,हा संसार सारा,!!
स्त्री मुक्ती अस आपण,पेपर,माशिकात,कधी सभेत,तर कधी,
बातम्या मधून ऐकतो,ज्या सामाज्याच्या रूढी परंपरा,या बन्धणात बांधल आहे,तो समाज मुक्त करील का,?स्त्रीला,..
एखाद्या स्त्रीला,सामाज्याची बंधनेझुगारून,मुक्त,आकाशात,
गरुड झेप घेता येईल का,?समाजाने पंख छाटून परंपरेची,
जोखड गळ्यात अडकवून डोळ्यावर झापडं बांधून स्त्रीला,
कधी स्वइच्छेने स्वास घेऊ दिला नाही.तिच्यावर अन्याय अत्याचार,करण्यातआले,तिची,घुसमट कधिच कुणी,
पाहिलीच''नाही.या महाराष्ट्रात अशा अनेक स्त्रिया जन्माला,
आल्या त्यांच नाव सुवर्ण अक्षरात् कोरलं गेलं, मोरोपन्ताचि,
राणी लक्ष्मी बाई,लखोजी जाधवांची जिजाबाई,हंबीराव मोहिते यांची ताराबाई,आणी बोयाजू यांची मदरेरिसा,अशा,
स्त्रियांनी इतिहास घडविला,स्त्री ही अबला आहे असं वाटत,
तुम्हाला ?कड्या कपारीतून काट्या कुठयातुन् जीवाची,पर्वा
न, करता आपल्या बाळा पर्यंत पोचणारी हिरकणी, पाठीवर,
बाळाला घेऊन रणांगणात लढणारी राणी लक्ष्मी बाई,
आकाशाला गवसनी घालणारी कल्पना चावला,आपला,
ठसा उमटवनारी एक न विझणारी जोत आहे.
आज आपल्या देशात,ये चिमुकली कळी,
जन्माला येऊ नहे म्हणून तिला गर्बातच् नस्ट केलं जात,.
ती आपल्या बाबाला ओरडून सांगते बाबा माला जन्माला,
येउद्या,मी काही मागणार नाही,शाळेत सुद्धा जाणार नाही,
कधी खाऊला हट्ट करणार नाही.पण मला जगूद्या,मला,
मारू नका.
आज 2023 मध्ये ही भारतीय समाज पुरुष प्रधान,
स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो.त्यांच्या भावनांना,
पायदळी तुडवलं जात ज्या स्त्रीची आपण लक्ष्मी दुर्गा,सरस्वती,म्हणून पूजा केली जाते,त्या स्त्रियांना जन्माला,
येण्याचा अधिकार नाही.अजूनही खेडोपाडी अशा रूढी परंपराच्या नावावर्ती मुलींच शोषण केलं जात.आज काळ,
बदलला असला तरी ,समाजात सु:ख समृद्धि नांदणार असेल,तर स्त्री पुरुषा प्रमांणे स्त्रियांना त्यान्चे हक्क त्यांना दिले पाहिजे.आणी प्रत्येक स्त्रियांना गरुड झेप घेताना,तुझ,
तुमच मातृत्व विसरू नका.मुलगी म्हणजे मायेचा, प्रेमाचा,
सागर आहे,आई वडिलांना सांभाळणारी मुलगीच् असते.
सासर माहेर यांना प्रेमाने जोडणारी मुलगीच असते.
बाबा म्हणून साधं घालणारी मुलगीच असते.
----👩-----
👩"स्त्री शक्ती आणी समाज,"

179 

Share


laxman shingre
Written by
laxman shingre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad