जीवन जगणार्या प्रत्येक माणसाला आपापल्या परीने लढाई करावी लागते प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा जरी असला तरी काही प्रमाणात तो चार वेगवेगळ्या स्वरूपाच्या लढाया म्हणजेच संघर्ष करत असतो कोणाला वैयक्तिक, कोणाला कौटुंबिक,कधी व्यावसायिक तर कधी सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला लढा देत असतो परंतु हे करत असताना माणुस म्हणून फारफार तर कोणत्यातरी एकाच क्षेत्रात यशस्वी होतो जर जास्तीत जास्त मेहनत घेतली तर कोणत्यातरी दुसऱ्या क्षेत्रातही अगदी खेचत यशस्वी होतो पण चारही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर मात्र कधी रात्रीचा दिवस तर कधी दिवसाची रात्र करावी लागते प्रत्येकाचा आपला असा वेगळा संघर्ष असतो कोणी एकातच जिंकतो तर कोणी चारही क्षेत्रात.बरेच जण उडणार्या धुरळ्यात मिसळून जातात पण जो मातीत आपले पाय घट्ट रोवून उभा असतो तोच शेवटपर्यंत कायम टीकतो.
संस्कृती १६१४