!!! सूत्रसंचलन एक तपस्या व साधना !!!
आदरणीय मित्रांनो,
सिंधुदुर्ग जिल्हातील दोन दशकाच्या वास्तव्यातील माझ्या ह्या सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीत अनेक विद्याविभुषित मित्रांची ओळख झाली. त्यांच्यासमोर मी मिणमिणता काजवा होतो तरीही विद्यानिधीनी मला आपला मित्र मानला त्यांच्या बरोबर बसण्याची संधी दिली. मला वडीलकीचा मान दिला.
ज्यांची अमृतवाणी तासनतास एकत रहावी असे वेंगुर्ल्यातील खर्डेकर काँलेजचे प्राचार्य आदरणीय श्री. देऊळकरसर, प्रा. श्री. सचिन परुळकरसर व आता त्याच काॅलेजचे विद्यार्थी असलेल्या विद्याविभूषित मित्राबद्दल मी आज व्यक्त होणार आहे.
एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आम्ही उभयता उपस्थित होतो. एक पंचवीशीतला तरूण आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करीत होता. त्यांच्या मुखातून येत असलेला प्रत्येक शब्द कानावर पडताना मनाचा ठाव घेत होता. आमच्या बालपणी अमीन सयानी साहेब, तब्बसूमजी, बाॅबी तल्यारखान तसेच तरुणपणी श्री सुधीर गाडगीळ, मंगला खाडिलकर आदी मान्यवरांचे शब्द कानावर पडले होते. त्याचबरोबर मराठी नाटकांची त्यात संगीत नाटकांची आवड होती त्यामुळे अनेक दिग्गज नटश्रेष्ठांचे शब्दफेक मी ऐकली होती तसेच स्मरणातही ठेवली होती. ह्या तरुणांनी सूत्रसंचलनाकडे जर लक्ष केंद्रित केले तर हा तरुण हजारो नाहीतर लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करील ह्याची आम्हा उभयतांना खात्री होती व त्या तरुणानी आम्हाला नाराज केले नाही. अवघ्या बत्तीसाव्या वर्षी ६४ पुरस्कारांवर त्यांनी आपले नांव कोरले त्यात आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचाही समावेश होता व तेही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला देताना त्या तरूणांजवळ असलेले शब्द भांडार व ते अचूक फेकण्याचे कलेचे मनापासून कौतुक केले होते.
मित्रांनो मी आता ज्या विद्यारत्नाबद्दल आपल्या समोर लिहीण्याचे धाडस करतो आहे ते आमच्या वेंगुर्ल्यातील खानोलीचे माननीय प्राध्यापक श्री.
.वैभव बाबल खानोलकर सर होत.
🎯 शिक्षण :-
© एम्.ए. मराठी.
© एम्.ए.हिंदी.
© एम्.ए,इतिहास.
© एम्.ए.राज्यशास्त्र.
© एम्.ए. तत्वज्ञान.
© एम्.फिल-दशावतार एक लोककला,पुणे
बी.एड्. व हे सर्व कमी काय म्हणून सर सध्या
© लाँ चा अभ्यास करताहेत.
🏏 सरांचे बालपण खानोलीत गेले, दशावतारी कलेचे जेष्ठ कलाकार, उत्कृष्ट पखवाजवाजक व खानोलकर दशावतारी कंपनीचे मालक श्री बाबा खानोलकर मेस्त्रींचे गांव.
खानोलीतील क्रिकेट सामन्यात समालोचन म्हणून विरंगुळा म्हणून आपली सेवा देणाऱ्या प्रा. वैभव सरांनी आज सरांनी देश विदेशातील १२०० पेक्षा जास्त व्यासपीठांवर आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनानी प्रेक्षकांबरोबरच व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनाही खुर्चीवर खिळवून ठेवलेले आहे.
त्यात डबलबारी,विविध क्रिडा स्पर्धेवेळीचे उद्धाटन संमारंभ,जिल्हास्तरीय मेळावे, शालेय कार्यक्रम, संगित मैफिली, राज्य स्तरीय संमेलन इत्यादींचा समावेश आहे.
🎯२०१९ साली आम्ही राबविलेल्या जिल्हास्तरीय वाद्यवादन स्पर्धा व खर्डेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय ( १९ वर्षाखालील मुलेमुली) व्हॉलीबॉल स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री खानोलकर सरानी केले व व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच मा. श्री. अशोक म्हापुस्कर सरांनी व्यासपीठावरुन उठून सरांना मिठी मारली व खास घरी येण्याचे आमंत्रण दिले.
🎯 एक दिवस संध्याकाळी सरांचा फोन आला," सर, तुमचे मार्गदर्शन हवे आहे सकाळी घरी येतो." ह्या विद्यासागराला मी काय मार्गदर्शन करणार मी हा म्हटले.
🎯 सकाळी नऊ वाजता संकल्पपुर्तीची बेल वाजली. बधितले तर दारात सर आपल्या गावातील ८-१० जणांना घेऊन हजर. मी सर्वांना घरात बोलवले सर, प्रथमच माझे घरी आले होते. मी त्यांना बसायला सांगितले. पण न बसता ते समोरील भिंतीकडे बघत उभे होते. माझ्या संपूर्ण आयुष्यात कमविलेले गुप्त धन दाटीवाटीने एकमेकांच्या मागेपुढे उभे होते, " सर, तुमच्याबद्दल मी बरेच ऐकले होते व अनेक शाळांमधून व गावातून तुमच्याबद्दल व तुमच्या घराबद्दल आदराने बोलणारे ग्रामस्थ मी पाहिले होते. ती सरांची संपत्ती नजरेखालून घालावी म्हणून मी व माझ्या गांवातील लोकांना घेऊन आलोय. " " सर आम्ही गांवात दशावतारी मंडळांची स्पर्धा ठेवलीय. आपल्याला आमंत्रण द्यायला आलोय."
🌹👏 मी आमंत्रणाचा स्विकार करून मी सरांना विनंती केली की ह्या कार्यक्रमात पाच दशावतारी मंडळ व पाच गुणवंत शिक्षकांचा सत्कार शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन दाभोलकर मेस्त्री परिवारातर्फे करू." सरांनी माझी विनंती मान्य केली.
*🎯 एम.फिल. :- दशावतार एक लोककला, पुणे:-* बालपणापासून दशावतारी कलावंतांच्या सानिध्यात वाढलेल्या श्री खानोलकर सरांनी कोकणातील ह्या पारंपारिक लोककलेकडे स्वतःला केंद्रीत केले.
🌹👏 अनेक जत्रा, आपल्या अभिजात अदाकारीने कोकणातील लोकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या कलाकारांच्या व्यथा लोकांसमोर आणण्यासाठी ते प्रत्येक कलाकाराना भेटले व त्या कलाकारानी दिलेल्या निस्वार्थ योगदानाबरोबच त्यांच्या व्यथाही त्यानी वर्तमानपत्रात छापून आणल्या. एवढे करून सर थांबले नाहीत तर दशावतारी लोककलेवर सखोल अभ्यास करून एम. फिल. केले व आता ते दशावतारी कलावंतांच्या लाईव्ह मुलाखती आपल्या ओघवत्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
*🌹👏शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम:-* नेमळे, सावंतवाडी व उभा दांडा वेंगुर्ले येथे शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या प्रा. खानोलकर सरांचे विद्यार्थी आज शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.
🎯 सरांनी वृध्दाश्रम व अनाथाश्रम साठी क्रिकेट स्पर्धा व संयुक्त नाटकांचे आयोजन जमलेला निधी वृध्दाश्रम तसेच अनाथाश्रमाला दिलेला आहे. तसेच त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे अकरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक सरांनी कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. तसेच कोरोना काळात गावोगावी फिरून दशावतारी कलावंताना मदत केली.
🎯 आज आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त प्रा. खानोलकर सर आपल्या कलेचा उपयोग अर्थार्जनासाठी न करता आपण केलेली तपस्या मुक्तपणे गरजवंताच्या ओंजळीत निस्वार्थपणे अर्पण करीत आहेत.
🌹👏 माझ्या एका विद्वान मित्रांनी मला विचारले, " अरे संपूर्ण आयुष्य तू मुंबईत काढलेस आता गांवात जाऊन काय माश्या मारतोस." मी हसलो व म्हटलं," आयुष्याकडे टाईमपास म्हणून बघणाऱ्या तुझ्या दृष्टीकोनाची मला किव वाटते कारण सेवानिवृत्तीनंतर मी अतिशय आनंदात आहे कारण मला सर्वश्री प्रा. वैभव खानोलकर सर, प्रा. सचिन परुळकर सर, सावंतसर, कांबळी सर, सुनील गोंधळीसर, बोबडेसर, प्रा. नाईक सर, झुंजार पेडणेकर सर, विनायक कांबळे सर, अनिल गोवेकरांसारखा विचारवंत व सेवाभावी शिक्षकवर्ग लाभलाय त्यांचा विद्यार्थी बनून मी आनंदाने माझा दिनक्रम घालवत आहे." तो मित्र निरुत्तर झाला.
🌹👏दाभोलकर मेस्त्री परिवाराकडून प्रा. वैभव खानोलकर सराना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आपला मित्र,
अशोक गणेश दाभोलकर-मेस्त्री,
मेस्त्रीवाडी, दाभोली, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.
दिनांक: १७/०१/२०२३.
संपर्क प्रा. श्री. खानोलकर सर : 9420307057