Bluepad | Bluepad
Bluepad
माय
सौ.अश्विनी अमोल जोशी
सौ.अश्विनी अमोल जोशी
17th Jan, 2023

Share

कळले मला न कधीही
चुकले कसे न काय
मी काळजीत होते
होते तुझी मी माय ||
तू दूर होत गेली
कळलेच नाही मजला
हा पिळ अंतरीचा
सांगेल गूज तुजला ||
जग शांत झोपलेले
तरी मी अशांत होते
तूज शांत झोप यावी
म्हणूनी मी गात होते ||
जगतात खूप होते
खुणवीत मजसी तारे
मी पाठ फिरवली अन्
जपले सदा तुला रे ||
अशा सदा मनीच्या
मी बंद ठेवल्या रे
तू झेप उंच घ्यावी
इतुकेच स्वप्न सारे ||
घे उंच झेप पिल्ला
नको ओढ या धरेची
आकाश पांघरावे
ही आस या मनाची ||
आकाश पांघरावे
ही आस या मनाची ||
*©®🖊️अश्विनी कुलकर्णी/जोशी,सोलापूर*

190 

Share


सौ.अश्विनी अमोल जोशी
Written by
सौ.अश्विनी अमोल जोशी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad