Bluepad | Bluepad
Bluepad
Title

प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
17th Jan, 2023

Share

💐अध्यात्म💐
आत्माचे ध्यान किंवा आत्म ध्यान म्हणजे आध्यात्म. आधात्म तुम्हाला जगायला शिकवते. स्वतःची ताकत ओळखायला शिकवते. Self help शिकवते. ते अधात्म कोणत्याही कर्मकांडा शिवाय देवाच्या जवळ पोहचवते किंवा त्याची ओळख करून देते ते म्हणजे अधात्म होय. तुम्हाला जबाबदार बनवते,शब्द पाळायला शिकवते,तुमच्या वृत्तीत बदल घडवून तुमची प्रवृत्ती मध्ये सुधारणा घडवून आणते ते अधात्म असते. अधात्म तुम्हाला सत्याची जाणीव करून देते ओळख करून देते आणि तेच मग सत्य हे शिव आहे. त्यावर प्रकाश टाकते आणि मग तुम्ही तुमच्या अंतरंगातील शिवाला भेटता आणि मग सारी जीवाची तगमग थांबते ते अधात्म असते. अधात्म तुम्हाला प्रेम करायला शिकवते आणि प्रामाणिकपणे ते शेवट पर्यंत निभवायला आणि टिकवायला ही शिकवते. एखाद्याला दिलेला शब्द कसा पाळावा आणि तो पाळला जावा असे जेव्हा तुमच्या अंतरमनात येते तेव्हा ते अधात्म असते. काळानुसार बदल आवश्यक आहे. परंतु किती बदलाल की माणूसकीच सोडून वागत आहात. एखाद्याच्या मोबाईलची रिंगटोन जर गेले दहा पंधरा वर्ष तिच असेल तर तो जुनाट किंवा बुरसटलेल्या विचाराचा नसतो. ति त्याचा रॉयल्टी आहे लक्षात ठेवा. तो खरा अधात्माच्या वाटेतला वाटेकरी आहे. आणि तिच त्याची प्रामाणिक बाजू आहे. अधात्म तुम्हाला चांगल्या वाईटाच्या पलीकडे घेऊन जाते. ते प्रवाह अनुसार पुढे जायला शिकवते. स्वतःच्या स्व ची ताकद ओळखायला शिकवते. वाईटातून चांगले बघायला शिकवते. एखाद्या कामात यश नाही मिळाले तर ते अपयश पचवून पुन्हा नव्या जोमाने काम करायला शिकवते. एखाद्याने जरी फसवले तरी देवा त्याला क्षमा कर आणि सद्बुद्धी दे अस म्हणायला किंवा विचार करायला शिकवते ते आधात्म असते. निस्वार्थ प्रेम आणि मदत करायला शिकवते. वेळ प्रसंगी जर कधी प्रेमात अपयश आले तर ते सक्रिय स्विकार करून पुढे जायला शिकवते. ते तिथच अडून किंवा अडकून रहायला नाही शिकवत तर जीवनात यापेक्षा खूप काही करण्यासारखे आहे. असे जे शिकवते ते अधात्म असते. एखाद्याने समोरून फोन कट केला नाही निट बोलला तर तर ठिक आहे त्याला काही काम असेल तो कामात असेल असा विचार करायला अधात्म शिकवते. तुम्ही उगाच चिडचिड करून घेत नाही शांत रहाता.
अध्यात्मात याचे असेल तर उगाच कोणते तरी कर्मकांड करायचे म्हणून येऊ नका. कारण ते मुळात कोणते कर्मकांड करण्यासाठी नाही तर या सगळ्यातुन बाहेर पडून तुमच्या आत्मरामाला ओळखण्यासाठी आहे. तुम्ही अंतरबाह्य बदलून जाण्यासाठी आहे. तुमचा आतील प्रवास सुरू करण्याचा तो मार्ग आहे. तुम्ही आतून एकदा बदलात मजबूत झालात तर बाहेरून काही बदलण्याची गरज नाही ते आपोआप बदलेल कारण पिंडी ते ब्रम्हांडी दिसे. म्हणून आधात्म हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रवास आहे. तुमची प्रतीभा उंचावण्याचा प्रवास आहे,तुम्हाला घडवण्याचा प्रवास आहे. अर्थात तुमची घडण्याची इच्छा असेल तर हा. उगाच यायचे म्हणून येऊ नये या मार्गात पूर्ण विचाराने या तुमच्या मनाला हे पटतय का ते बघा.
परंतु मी तर म्हणेण जरूर सर्वांनी यावे आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करून घ्यावे. आणि तसे ही तुम्ही षडरिपूच्या आहारी नसाल तर तसेही आधात्माच्या वाटेवरच असता ज्याला संयम, धिर,शांतता आहे. तु या मार्गाचा प्रवासी आहे. तुमचा आत्मविश्वास,धाडस, स्पष्टवक्तेपणा सारे काही या मार्गात तुम्हाला शिकायला मिळतते.
म्हणून नेहमी आत्माचे ध्यान करा म्हणजे समाधान लाभेल शांती लाभेल. कारण या जगात समाधान आणि शांत याहून मोठे सुख नाही. पुरे झाली ही जीवाची हेळसांड आता त्याला आत्म चिंतन वा आत्मशांतीची वाट दाखवा. बघा पटतय का? समजायला गेले तर आधात्म खूप सरळ साधे सोपे आहे. आणि ठरवले किंवा नाही समजले तर अवघड देखील वाटते. शेवटी निर्णय तुमचा आहे.
प्रीती लांडगे.

0 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad