मी पोर्तुगीज चर्च च्या सिग्नलला बाईकवर थांबलो होतो.
बाजूच्या रोड डिव्हायडरवर एक माणूस कुत्र्याला घेऊन उभा होता. कुत्रा शांतपणे बसला होता...तो माणूसही कुत्र्याची चेन हातात धरून आरामात उभा होता...त्यांना रस्ता ओलांडायचा नव्हता हे कळत होतं..
मी त्याला म्हणालो ...कुत्र्याला बांधून का ठेवलंय..?
कुत्रा माझा आहे म्हणून .....तो.
साखळी सोडून बघा...मी.
सिग्नल सुटला...मी बाईक काढली. मनात विचार आला...जे आपलं आहे ते सोडून देता आलं पाहिजे ..परतून आलं तरच ते आपलं..अन्यथा सगळं साखळीने बांधलेल्या त्या कुत्र्यासारखं....
विनय नारायण
१७ जानेवारी २०२३