देह पंढरी आत्मा श्री हरी
गुरू ज्ञानाने आली प्रचिती खरी
चंद्रभागा जणू ज्ञान गंगा
भाव भक्तीचा उठवी तरंगा
देई सचेतना करी निर्मळ मना
वाहे दुथडी भरुन माझिया अंतरी ll 1 ll
देह पंढरीत शोधूनी पाहे
आत्म्याविन देह वाळवंट आहे
नित हरी उच्चारी ये जा करतो वरी
श्वास मम देहाचा आहे वारकरी ll 2 ll
याला न लागे टिळा माळा गंध
श्री विठ्ठल निर्गुण स्वानंद
चैतन्याचा गाभा सूक्ष्म रूपे उभा
मम हृदय पटाच्या विटेवरी ll 3 ll
माऊली ज्ञानेश्वर नाम याला
हाच तुकोबाला प्रतेय आला
सद्गुरू कृपेने एकनाथ म्हणे
देखिला देव सभ्याय अभ्यांतरी ll 4 ll