Bluepad | Bluepad
Bluepad
याला काय म्हणावे
गोपाल मुकुंदे
गोपाल मुकुंदे
17th Jan, 2023

Share

*याला काय म्हणावे ?*
पोलीस विभागात नोकरी करून जवळ जवळ 22 वर्ष झाले,अनेक अनुभव भूतकाळात लपले आहेत,सुखाचे आहेत तर काही दुःखाचे सुद्धा.
2012 ला सिटी कोतवाली ला नोकरी सुरू होती, तस लग्न 2007 ला च झालं होतं आणि नाही म्हणता म्हणता संसाराचा वेल चांगलाच लांबला होता एक मुलगी आणि दुसरा मुलगा,असे छोटं कुटुंब चांगलं शिक्षण मिळावे म्हणून खेडे सोडून अकोल्यात राहायला आलो,आणि मोठया मुलीला मोठ्या शाळेत टाकलं,सिटी कोतवाली म्हणजे अकोल्याचे नाक बंदोबस्त आणि तशीच गुन्हेगारी,सोबतच,निदर्शने,मोर्चे,भांडणे, असायची आणि याही काळात 7 दिवस दिवस पाळी आणि 7 दिवस रात्र पाळी,असा दिनक्रम सुरू होता.
पोलीस म्हटला की जनतेसमोर उभा राहतो,तो चित्रपटा तिल दृष्य आणि असे काही रंगवलेले असते की एक खलनायक ची भूमिका लोकांच्या नजरेसमोर उभी राहते,आणि सर्वसामान्य माणूस या मुळे जवळ न येतां दुरावल्या जातो,पण वास्तविकता काही वेगळीच असते,तुम्ही म्हणाल एवढं सांगायचा प्रपंच कशासाठी त्याचे कारण ही खास आहे.पोलिसांचे मुख्य सण,उत्सव,गणपती उत्सव सर्व काही घरं सोडून असतात,मुलांच्या आनंदात सहभागी सुद्धा होता येत नाही,असाच काहितरी प्रकार माझे सोबतही घडला माझे मुलीचा जन्मदिन होता तोही 5 वा सर्वाना घेऊन आनंदात करायचा ठरवलं आणि लगबग सुरू झाली जणू काही लग्नाची तयारी करतात तशी,आचारी,डेकोरेशन, सर्व काही, आणि जन्मदिनाची तारीख दोन दिवसात येऊन ठेपली तेच आनंदात विरजन पडले ते म्हणजे निवडणूक बंदोबस्त आला तोही ग्रामपंचायत बंदोबस्त आणि तेही ग्रामीण भागात जावे लागणार होते,मी साहेबांना विनंती केली,पण साहेबांचा सुद्धा नाईलाज होता जावे लागणार च होते,म्हणून मी सुद्धा मानसिकता बदलवत,तानाजी मालुसरे ची आठवण करत आधी निवडणूक नंतर जन्मदिन,असे म्हणून मुलीची समजूत काढत,आणि केलेल्या नियोजनातील सर्व ऍडव्हान्स डूबला असे म्हणून कार्यक्रम रद्द करीत,आनंदाची संकल्पना बदलवत,मोठा कार्यक्रम रद्द केला,आणि कर्तव्ये महत्वाचे म्हणून निवडणूक बंदोबस्ताला निघून गेलो,चित्रपटात दाखवले जाते पण प्रत्यक्ष अनुभव काही वेगळाच असतो,घरच्या मंडळींचे टोमणे,नातेवाईकांचे वेग वेगळे बोल,जसी काही यालेच नोकरी आहे बाकीचे रिकामेच आहेत जसे,असे म्हणून वेगळे,वेगळे अलंकारीक शब्द ऐकायला भेटले,पण इलाज नव्हता,निवडणूक बंदोबस्त होता,पोलीस लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बाहेर असतो आणि स्वतःचा घरच्या सुरक्षितेची जबाबदारी त्याच्यावर नसते आणि नेमकं तेच झालं घरी लहान बाबूं आमचा 3 वर्षा चा होता आणि घरगुती जन्मदिन साजरा करावा म्हणून हरभरा घुगरी करावी म्हणून हरभरे भिजू घातले गेले आणि त्याच टोपल्या वर याचे 3 वर्षीय चिरंजीव यांनी ताव मारला आणि एक हरभऱ्याचा दाना सरळ नाकात घातला तो गेला कसा देव जाने,पण गेला हे महत्त्वाचे होते ही घटना संध्याकाळ ची होती,बायको काळजीत पडली,आता काय करावं काही सुचेना,नवऱ्याला फोन लावावं तर ते तिकडे टेन्शन मध्ये येतील,आणि नाही सांगितले तर आपण कुठं डॉक्टर शोधणार एवढ्या रात्री,आणि शेवटी बायकोने निर्णय घेतला नवऱ्याला काही ही न सांगता आपणच काहीतरी करायचे, उद्याचा जन्मदिन तो विषय वेगळा झाला,आणि हे प्रकरण दुसरच होत,आता काय करावं,कोणत्या डॉक्टर कडे जावे,कोण काढील हे नाकातील संकट बाळाचे रडणे,काही थांबेना,नवरा ड्युटी वर 5 वर्षांच्या मुलीला घरी सोडून बायको दवाखान्याच्या रस्त्याने निघाली माहीत काहीच नाही,पण आलेले संकट दूर कसे होईल याचा ध्यास तिला लागला ऑटो रिक्षा करून बायकोने दवाखाने हुडकले पण डॉक्टर उपलब्ध होत नव्हते,अशा वेळेस मोठे प्रयत्न करून रात्री 10 वाजता डॉक्टर नि नाकातील हरभरा काढला व सुटकेचा स्वास सोडला.
वरील प्रसंग एक उदाहरण म्हणून मी सांगितले आहे जे वास्तविक खरे आहे .अशा संकटात आपल्या कुटुंबाचे मदतीला कोणीच धावून येईल याची गॅरंटी नसते,पण अशा ही परिस्थितीत पोलीस आपले काम करत असतो,मुलीचे लग्न प्रसंग,आहेत,मरण धरण आहेत,अशा वेळेत सुद्धा पोलीस आपल्या आई वडिलांच्या सेवेत हजर असेलच असे नसतेच कारण तो कोठेतरी गुंतला असतो बंदोबस्तात.आणि लोकांची सुरक्षा तो करत असतो. आणि स्वतःच्या कडे दुर्लक्ष च तो करत असतो. स्वतः मानसिकता,शारीरिक ताणतणाव च्या परिस्थितीत त्याचे आयुष्य जात असते,घरी कुटुंब,बाहेर नोकरीचा ताण.
काय तर तो आहे भारताचा जवान अशी अवस्था असते ही कोठेतरी बदलली पाहिजे,
*खाकी वर्दी वाले*
*हमेशा सावधान नजर आते है*
*जिंदगी तो रहतेही है*
*और मरणे पर भी*
*कब्र मे भी सावधान ही नजर आते है…*
नोकरी मध्ये पोलीस हा जनतेचा सेवक आहे.आणि शेवटी तो सुद्धा माणूस आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे एवढंच….
- गोपाल मुकुंदे

178 

Share


गोपाल मुकुंदे
Written by
गोपाल मुकुंदे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad