मकरसंक्रांत...प्रेमी युगुलाची.
मकरसंक्रांत...प्रेमी युगुलाची.
गोडी तुझ्या नाजूक ओठांची
नाही आणखी दुसऱ्या कशाला
गोडीत सांगतो हे गुपित मी
लाजतेस तू उगाच इतुकी कशाला
तो तीळ तुझ्या ओठांवर
उगाच का खुलून दिसतो
त्याला ही माहिती गोडी त्यांची
त्या ओठांचीच सदा ओढ त्याला
भरीस भर म्हणूनी ती
तुझ्या गालावरची गोड खळी
लाजून हासतेस तेंव्हा इकडे
माझा हा कलिजा खलास झाला
या ओठांआड लपल्या जणू
मोत्यांच्याच शुभ्र दंत पंक्ती
शब्दांत वर्णू कसे सौंदर्य तुझे मी
माझ्या शब्दांचाच खजिना रिक्त झाला
वाटेल ते म्हणो कोणी मजला
वा कोणी मला म्हणो प्रियकर वेडा
हे वेडचं तर असते प्रेमात खरे
या वेडापायीच जणू हा प्रेमरोग झाला.
डॉ अमित.
मंगळवार
१७ जानेवारी २०२३.