*💠"उत्तरे तुमच्या अनुत्तरीत प्रश्नांची"👏*
*➡️ "परमार्थ"* प्रभूचे ज्ञान (प्रज्ञान)
(science of consciousness)
*प्रश्न १३ :* परमार्थात पडलेल्या साधकांना संत-सत्'पुरुषांकडून "ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।।" असा धडा शिकविण्यात येतो. या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टीकोन काय आहे ?
*उत्तर :* व्यवहाराच्या दृष्टीकोनातून संतांनी सांगितलेला वरील धडा योग्य नाही, असा जीवनविद्येचा दृष्टीकोन आहे. *"अनंत किंवा भगवंत आपल्याला विशिष्ट परिस्थितीत ठेवतो'' हा मुद्दाच मुळात जीवनविद्येला मान्य नाही.*
*✅ आपण ज्या परिस्थितीत असतो ती परिस्थिती भगवंतानी आपल्यावर लादलेली नसते, तर ती परिस्थिती आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली असते.* चैनबाजी करून कर्जबाजारी होणारे लोक, दारू, मटका, जुगार, गर्द वगैरे व्यसनांच्या आधीन होऊन दुःखात पिचत पडणारी व्यसनी माणसे, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर भटकत फिरणारे विद्यार्थी, दैववादाच्या आहारी जाऊन संसाराकडे, बायका-मुलांकडे व नोकरी धंद्याकडे दुर्लक्ष करणारे पारमार्थिक, दुर्जन लोकांच्या संगतीत राहून स्वतःचे वाटोळे करून घेणारी निर्बुद्ध माणसे, संसारातील दुःखद प्रसंगावर किंवा अडचणीवर मात करण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करण्याऐवजी, देव-देवस्की करणाऱ्या बाबा, बुवा, भगत, फकीर यांच्याकडे जाणारी अडाणी माणसे, *अशा या सर्व लोकांच्या परिस्थितीकडे जर आपण पाहिले तर ती विशिष्ट परिस्थिती त्या लोकांनी त्यांच्या मूर्खपणाने स्वत:वर ओढवून घेतलेली असते.*
*➡️ तेथे "अनंत वा भगवंत" यांचा कांहीही संबंध नसतो. या लोकांनी अशा परिस्थितीत ''ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असो द्यावे समाधान'' असे म्हणणे म्हणजे एका बाजूने स्वतःची फसवणूक करून घेणे असून दुसऱ्या बाजूने भगवंतावर घोर अन्याय करण्यासारखे आहे.*
💠 दुसरा मुद्दा असा की, वरील धडा गिरवायचा असे जर ठरविले तर माणसाची प्रगती होणे केवळ अशक्य आहे. *एखादा विद्यार्थी जर सर्व विषयात नापास झाला व मुलगा ''ठेविले अनंते तैसेची रहावे'' असा धडा गिरवत समाधानी वृत्तीने अभ्यासाकडे पाठ फिरवू लागला तर त्याचा परिणाम त्याच्या स्वतःवर व पालकावर काय होईल?*
*उन्नती व उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्नांची कास धरण्याऐवजी ''ठेविले अनंते तैसेची रहावे'' अशा वृत्तीने समाधानात रहाणारा समाज किंवा राष्ट्र रसातळाल