Bluepad | Bluepad
Bluepad
वजन कमी करण्याचे उपाय
m
mahadev shinde
17th Jan, 2023

Share

*वजन कमी करण्याचे प्रभावी उपाय*
लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. 21 दिवसाचा डायट प्लान आहे त्यांनी लवकर वजन कमी होते. कोणतेही साईड इफेक्ट नाही कोणतेही आजार होत नाहीत. आणि असतील तर तेही जातात.
1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.
3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.
4. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.
5. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.
6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4-5 किलोमीटर जलद चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा. शक्यतो रात्री शक्य तितक्या लवकर म्हणजे 7 च्या आतच जेवण उरकावे.
7. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.
*अधिक माहितीसाठी खाली लिंक जॉईन करा आणि भरपूर लोकांना शेअर करा*
https://chat.whatsapp.com/ILCAaTTzTiREL93D8EF75p

0 

Share


m
Written by
mahadev shinde

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad