अवघ्या दोन अक्षरांचा शब्द "नातं" . बोलण्यासाठी अगदी सोपा आणि लहान. पण आयुष्य भर निभावणं म्हणजे कठीण. तू माझी , तू माझा , तू आपलाच माणूस आहेस हे बोलणे खूप सोपे. पण त्या आपल्या नात्यांना आयुष्य भर निस्वार्थ पणे जपणे म्हणजे कठीण.
त्या नात्यांना वेळ देणे म्हणजे अगदी अवघड झालय हल्ली. त्यात हल्ली निघालेल्या नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे समोरासमोर भेटून दोन शब्द बोलणे तर लोक विसरूनच गेली आहेत. आणि त्यात हल्लीची पिढी तर फक्त मोबाईल, कॉम्प्युटर , लॅपटॉप एवढंच घेऊन बसतात.