अवचित बसूनी हिंदोळ्यावर
मन पाहे नेत्री अंबर,
उपवनांतुनी त्या तृणांवरुनी
वाहे तो अचल निर्झर......
मनातूनी माझ्या तुम्हाला पाहावया
जडलीया भेटीची आस,
त्या कळ्यांसमवे सोबत घेऊनी
तुमच्या आठवणींची रास......
गंध परीमळूनी दाहीदिशांना
ना दिसे ना मजला तीर,
हर्षावूनी येती रोमांतूनी ऐकू
कोकीळेचे अलगद सुर......
स्वच्छंदी दिसे त्या दर्पणांमधूनी
ना स्वप्न असे ना ते भास,
फुंकर पडूनी अवभासांवरी
मज मिळे मोकळा श्वास......
पद्मासनापरी ती तृषा आगळी
मना जडली तुझी गोडी,
येऊनी अवकाळी आठवण ती
माझी पाठलाग ना सोडी......