Bluepad | Bluepad
Bluepad
स्वातंत्र्याची चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्र संत भगवान बाबा यांनी भक्ती मार्गाचा अवलंब केला
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
17th Jan, 2023

Share

*स्वतंत्र्याची चळवळ गतीमान करण्यासाठी राष्ट्र संत भगवान बाबा यांनी भक्ती, मार्गाचा अवलंब केला*
साधु ,संत महंत यांचं राष्ट्र निर्माण करण्या मध्ये खुप मोठं योगदान असतं .कालखंड कोणाताही असेल त्या त्या कालखंडातील त्या त्या महान थोर पुरषांचे योगदान हे सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारख अनमोल असतंच . नवनाथ भक्ति संप्रदायातील संत अवजीनाथ महाराज यांच्या कार्याचा आलेख पुढे नेताना एकोणिसाव्या शतकात मध्ये राष्ट्र संत भगवान बाबा व सद्गुरू संत वामन भाऊ महाराज यांनी दिलेलं योगदान आणि दरम्यानच्या काळात भारताचा स्वातंत्र्यलढा याचा भक्ति शक्ति आणि अहिंसा मार्गाने देशाच्या हितासाठी योगदान देत आयुष्य समर्पित करण्याची भावना ह्या अनेकांच्या मनात रूजवली . प्रवासाच्या फार सुविधा नसताना देखील देश भर प्रवास करत लोकजागृती निर्माण केली. आध्यत्मिक ज्ञान पीठ सामाजिक परिवर्तनाच माध्यम ठरलं आणि अहिंसा हि अध्यात्माची शिकवणं संतांनी दिली.या शिकवणीचे विस्तारीकरण करत लाखो लोकांना स्वतंत्र लढया सोबत जोडण्याची किमया राष्ट्र संत भगवान बाबा व वामन भाऊ यांनी केली हे योगदान सर्वसाधारण नक्कीच नाही पण संतांचं कार्य हे लाभा विना प्रिती हा संतांचा स्वभाव असल्याने संत हे कधीच कुठल्या कार्यच श्रेय स्वतः हुन घेत नाहीत.परंतु संत हे देशाच्या हितासाठी आपलं आयुष्य समर्पित करत असतात अहिंसा हा जरी संतांचा प्रांत असला तरी तरी अहिंसा मार्ग वरील संतांचे राष्ट्र निर्मिती मधील योगदान हे विसरून चालणार नाही . शेवटी देशाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास हा अनेक महापुरुषांनी आप आपल योगदान देऊन घडविलेला असतो . प्रभु श्रीराम यांनी लंकेत जाताना जो सेतु निर्माण केला त्या मध्ये खरीचा सुद्धा वाटा होता . म्हणजे मार्ग कोणता आहे याला फार महत्त्व नसत त्या वाटा असणं महत्त्वाचं आहे.आणि संतांचा देशाच्या हितासाठी अहिंसा मार्गाने खुप मोठा वाटा असतो . कारण लाखो लोकांना सामाजिक उपदेश करत वैचारिक परिवर्तन करन हे अशक्य प्राय कार्य संत पुर्ण करत असतात आणि ते हि कोणाचं मन न दुखावता अहिंसा हि संताची शिकवणं आहे आणि अहिंसेच्या मार्गाने जग जिंकता येते.आपण तर फक्त पारतंत्र्यात आहेत . आणि यावेळी राष्ट्रहित प्रथम आहे . राष्ट्र रक्षण करायचे असेल तर आपण सगळ्यांनी आपलं योगदान दिले पाहिजे.आणि इंग्रजांच्या कडुन तसेच त्यावेळी इंग्रजांचे काही मांडलिक राजे यांच्या सर्व सामान्य माणसांवर होणारा अन्याय, विविध धर्म कार्यवरील बंदी आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे धार्मिक सामाजिक स्वातंत्र्य नव्हते, लोकांना एकत्र आणणं सुद्धा कठिण होत .मग लोकांना एकत्र करून धीर देत उपदेश देण्यासाठी राष्ट्र संत भगवान बाबा यांनी देश पिंजून काढला,भजन कीर्तन,अंखड हरिनाम सप्ताह,नारळी साप्ताह या माध्यमातून लोकांना अध्यात्माची भक्ति मार्गाची गोडी लावली . अध्यात्माच्या माध्यमातून अनेक लोकांच्या दुःखाला फुंकर घालत त्याच्या मध्ये चैतन्य निर्माण केले.आपल्यावर कोणी अन्याय जुलूम केला तर न घाबरता, अहिंसा मार्गाने प्रतिकार केला पाहिजे,संयम दया शांती क्षमा ,आणि मौन हे जीवनातील महत्त्व पुर्ण अंलकार आहेत.आपल्यावर कोणीतरी अन्याय करतय आणि हा अन्याय आपण सहन न करता अहिंसा मार्गाने आपल्या हक्काचे रक्षण केले पाहिजे हि शिकवण देत असताना लोकांना भक्ति मार्गावर आणत देशहिताची गोडी निर्माण करताना .निजाम आणि इंग्रज तथा काही स्वकिय यांच्या कडुन राष्ट्र संत भगवान बाबा यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास दिला परंतु त्यांनी एतकिंचित सुद्धा न डळमळीत होता आपलं कार्य आयुष्य भर खडतर संघर्ष करत यशस्वी केले त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणुन देशाला स्वतंत्र तर मिळालच पण मराठवाडा मुक्ती संग्रामा मध्ये सुद्धा खूप मोठ योगदान भगवान बाबा यांच आहे

165 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad