Bluepad | Bluepad
Bluepad
देश हितासाठी राष्ट्र संत भगवान बाबा यांनी केलेलं कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारख
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
17th Jan, 2023

Share

देशहितासाठी राष्ट्र संत भागवान बाबा यांनी केलेलं कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारख
अनेक महापुरुषांनी आपलं जीवन त्या वेळी त्या कालखंडात देशहितासाठी समर्पित केलेल असतं त्यामधुन त्या त्या कालखंडातील व भविष्यातील पिढी हि प्रेरणा घेत असते . त्याच प्रमाणे एकोणिसाव्या शतकात, देशाच्या स्वतंत्र चळवळीत अहिंसा ज्ञान भक्ती मार्गाने, अलौकिक योगदान, देत असताना सामाजिक, पातळीवर, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार, अध्यात्मिक भक्ती मार्गामुळे, व्यसनाधीनता संपुष्टात आणत एक सुसंस्कृत,शिक्षित,माणुसकी जपणारी देशांसाठी सर्वस्व पणाला लावणारी पिढी निर्माण करण्याचं महान कार्य राष्ट्र संत भगवान बाबा यांनी केले हे कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले तरी सुद्धा कमी आहे .देशाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा अहिंसात्मक मार्गाने घडविलेल परिवर्तन, सर्व सामान्य माणसा मध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास , भक्ति आणि शक्तिच सामर्थ्य देशाहितासाठी आयुष्य समर्पित करत आयुष्भर लोक उपदेश करत कृतीशील समाजसेवक ,समाज सुधारक, अहिंसा मार्गाने देशाला स्वतंत्र मिळावं म्हणून गावोगावी खेड्या पाड्यात किर्तन भजन करत देशभरात भ्रमण करत लोकजागृती निर्माण केली.सत्य, मानवता, अध्यात्म आणि ज्ञान भक्ती मार्गावरुन, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद, धर्मभेद, यांसह कालबाह्य रूढी परंपरा संपुष्टात आणत शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवणारे आधुनिक भगिरथ राष्ट्र संत भगवान बाबा यांच देशाहितासाठी चौफेर कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारखा आहे. देशात इंग्रजांची सत्ता आणि मराठवाड्यात हैदराबाद स्थित निजामाची राजवट असताना ऐकणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला संतांची भूमी म्हणून ख्याती असलेल्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणी सर्वसाधारण कुटुंब मध्ये जन्म झाल्यानंतर अगदी बालवायात पंढरीच्या पांडुरंगा समक्ष संबंध जीवन बलोक कल्याणासाठी देशाहितासाठी समर्पित करण्याचा प्रण करून विठ्ठलाचा कौल मिळालेला अबाजी गुरूमंत्र दिक्षा घेताना गरूडावर स्वार होऊन भगवान विष्णू च्या रुपात प्रकट झाल्याने गुरु माणिक बाबा कडुन भगवान हे नामकरण झालं . पुढे कठोर तपश्चर्या निर्जळ अवस्थेत करून नव निधी अष्ट सिद्धी प्राप्त केल्या.नारायण गडाचे उतर अधिकारी झाल्यानंतर ह भ प बंकट स्वामी महाराज यांच्या सोबत आळंदी येथे आध्यत्मिक ज्ञान घेत देशभर, वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भ्रमण केले, अहिंसा मार्गाने किर्तन भजन या माध्यमातून स्वतंत्र चळवळ गतीमान केली , अहिंसा हा न्याय मिळविण्यासाठी उत्तम मार्ग आहे हे लोकांना ज्ञान भक्ती आणि अध्यात्म मार्गाने समाजावले, ऐतिहासिक गोहत्या बंदी करण्यासाठी अहिंसा मार्गाने यशस्वी करत चिंचाळा तालुका वडवणी येथे निजामशाही राजवटीत असताना देखील कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण न होऊ देता अध्यात्मिक शक्तीने गोहत्याबंदी केली.शिक्षणाच महत्व पटवून लोकांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शाळा धौम्य गडावर शाळा काढली .औरंगाबाद येथे उच्च शिक्षणासाठी बोर्डिंग निर्माण केली ज्या मध्ये अनेकांनी उच्च शिक्षण घेतल .सुसंस्कृत समाज घडवुन देशहितासाठी रक्षाणासाठी जीवन समर्पित करणारी ज्ञान , भक्ति आणि अहिंसा मार्गाने आचरण करणारी युग प्रवर्तक सत्यनिष्ठ पिढी घडविण्याचे अलौकिक कार्य राष्ट्र संत भगवान बाबा यांनी केले . एकंदरीत राष्ट्र हित जोपसाताना ,ज्ञान , भक्ति, शक्ति आणि अहिंसा या मार्गाने लोकांना एकत्र ठेवण्यासाठी विचारांचे संस्कार मजबूत होण्यासाठी नाराळी साप्ताह हि परंपरा नव्याने चालू करून यशस्वी राबवली देशाच्या, सामाजिक सांस्कृतिक, जडणघडणीत, सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारख अनमोल योगदान महाराष्ट्र राज्यातील अनेक दिग्गज संत महंत यांनी दिलं आहे .आणि त्यापैकी एक म्हणजे राष्ट्र संत भगवान बाबा ज्यांनी आध्यात्म क्षेत्रातील धुरव तारा ठरेल असा भव्य दिव्य धौम्य गड निर्माण केला आणि याच गडाचं नामकरण तात्कालिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भगवान गड केले.आपला उत्तर अधिकारी म्हणून भगवान बाबा यांनी भिमसिंह महाराज राजपूत यांची निवड करून जातीभेदाला मुठमाती देत सर्वधर्म समभाव हा मोलाचा उपदेश केला. एकंदरीत देशाच्या हितासाठी आयुष्य समर्पित करणारे शांती ब्रह्म राष्ट्र संत भगवान बाबा यांच कार्य हे सुवर्ण अक्षरांनी लिहणयासारखा आहे. गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबीर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301

178 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad