मैत्री.मैत्री एक अस नात आहे ज्यात वयोमर्यादा ,जातीभेद,रंगरूप उच्च-नीच हे सगळं पाहिलं जात नाही .मैत्री हे एक अस नात आहे, जे आयुष्य सुंदर बनवत .प्रत्येकाला एक मित्र किंवा मैत्रीण असायलाच पाहिजे कारण तिथेच मनमोकळे होते ,शांती ही असते,आणि गोंधळ ही असतो अशी असते मैत्रि विषयी आपल्याला आपुलकी आणि जिव्हाला असतो .एकमेकांच्या आवडीनिवडी मिळत्या जुलत्या असतात, मैत्री हे एकच अस नात आहे ,जे सर्वांना मनापासून आवडत ती मूल/मुली खूप भाग्यवान असतात ज्यांच्याकडे असा एक जिवलग विश्वासू मित्र किंवा मैत्रीण असते.
मैत्री हा एक सर्वांच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे.एक घट्ट मैत्री सोबत हसणं ,खेळण ,बांगडणं मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकींना सांगणं एकमेकीच्या हसण्या-रडण्यात सहभागी असणं यालाच तर खरी मैत्री म्हणतात.मैत्री हा आयुष्यातला प्रत्येक क्षण जगायला शिकवते .आयुष्य सुंदर बनवते.मैत्री आपल्या स्वतःला ओळखायला शिकवते.अशी असते ही मैत्री,मैत्री खूप काही शिकवते जगायला शिकवते .हसायला शिकवते,रुसायला शिकवते.मैत्रीच हे एक वेगळंच जग आहे.ज्याला एक सुंदर नाव दिलंय मैत्री.कस एक वेगळंच नात आहे ना? अशीच असते ही मैत्री.