Bluepad | Bluepad
Bluepad
विकृतीचे स्वीकृती मध्ये परिवर्तन होण्यासाठी मानवी जन्म
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
17th Jan, 2023

Share

*विकृतीचे स्वीकृती मध्ये परिवर्तन होण्यासाठी मानवी जन्म*
मानव हा सृष्टीच्या रचनेतील सगळ्यात सक्षम चाणक्ष, हुशार, बुद्धीमान प्राणी . निसर्गातील इतर प्राणी व आप्तस्वकीय मानवी समुह यांच्या सोबत मानवाच आचरण हे गुणदोषानुसार ठरत . मुळात आपल्या मध्ये असणारी प्रचंड विकृती हि हाळुहाळु नष्ट करत योग्य पद्धतीने स्वतःला स्वीकृती मिळवत आपल्या मध्ये असणारे सर्व दुर्गुण अहितकारक बाबी संपुष्टात आणत चांगल्या सवयी सद्गुण अंगिकार करत आपलं जीवन लोककल्याणासाठी समर्पित करत आपल्याला स्वीकृती मिळवुन देण्यासाठी आहे .शरिर हे अनेक प्रकारच्या गुणदोषाचे भांडार आहे.जशी वेळ येईल तसे एक एक गुण दोष प्रकट होत असतात.जीवन मार्गावर वाटचाल करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. प्रसंगांनुसार जरी गुण दोष विशाल रूप धारण करत असले तरी विकृतीचे स्वीकृती मध्ये परिवर्तन होण्यासाठी मानवी जन्म आहे .पण मुळात हिच बाबा आपल्या लक्षात येत नाही .आणि त्यामुळे आपला प्रवास हा विकृती ते विकृती असाच आयुष्भर राहतो .त्या मध्ये बदल परिवर्तन होत नाही.जीवनातील खरी गरज असते ती विकृती ते स्वीकृती या मार्गावरून प्रवास होण्याची .पण शक्यतो असं होतं नाही .महणुन विकृती ते स्वीकृती हा प्रवास यशस्वी रित्या पुर्ण करण्यासाठी हा मानवी देह हेच आपल्याला उमजत नाही हे जीवाच दुर्भाग्य आहे. मिळालेला देह सत्कारणी लावत आणि सध्या काय, उद्दीष्ट काय, धेय्य काय आहे हे समजुन त्या दिशेने योग्य मार्गक्रमण करत आपल्याला मिळालेला मानवी देह आपल्याला नेमका कशासाठी प्राप्त झाला आहे हे समजुनच आचरण करण गरजेचे आहे.एकदा का आपल्याला जन्मच साध्य कारण समजलं कि मग उर्वरित कार्य सोपं जातं . मानवी जीवनात अनेक घटना घडामोडी घडत असतात आणि याच दरम्यान प्रत्येक व्यक्ती मध्ये असणारे वेगवेगळे रूप आपल्याला पाहायला सुद्धा मिळत . जन्मताच कोणीही चांगला वाईट नसतो .पण एकदा परिणाम समजायला लागले कि मग खरं आयुष्य तिथुनच पुढे चालू होतं . आणि याच दरम्यान आपल्याला कडुन अनेक चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्या मध्ये संगत वातावरण , वेळ प्रसंग याचा मोठा वाटा असला तरी मुळात आपण घेतलेला जन्म सार्थकी लावायचा असेल तर सृष्टी वर उपलब्ध ज्ञानाचा अंवलब करत अनुभुती घेत आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश बदलता आला पाहिजे.आणि सर्व दोष नष्ट करून जीवला देवत्व प्राप्त करून देता आलं पाहिजे आणि हे फार कठिण काम नक्कीच नाही .हे अगदी सहजासहजी शक्य आहे. फक्त आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू समजला पाहिजे आणि मुळ हेतु हाच आहे कि अनेक विकृती नष्ट करून जीवाला स्वीकृती मिळवुन द्या.महणजे जन्म सार्थकी लागला म्हणून समजा आणि विकृती ते स्वीकृती हा प्रवास यशस्वी झाला तरच आपण घेतलेल्या मानवी जन्माचे हित साध्य झाले
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

177 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad