Bluepad | Bluepad
Bluepad
शुभ .....
विश्वास बीडकर
17th Jan, 2023

Share

शुभ मंगळवार .
काय आवडतं तुम्हाला .....
प्रवास करायला का प्रवासाचं प्लॅनिंग करायला .
दोन्ही आवडणं हा खरा मध्य बिंदू .
कधी कधी प्लॅनिंग मध्ये चं जास्त मजा येते . खरा प्रवास सुरू झाला की ,
" आता संपणार हा आनंद " असं वाटू लागतं .
मग गाणं आठवतं ,
" गोडी अपुर्णतेची ..."
आपण नियोजन करून केलेला प्रवास आणि केसरी किंवा तत्सम कंपनी बरोबरचा प्रवास ह्यात ही खूप अंतर असतं .
आपल्या घरातलं लग्न आणि दुसरयाचं लग्न यात जेवढं अंतर असतं तेवढंच कदाचित .
मुलगी - मुलगा शोधण्यापासून ते सासरी निघाल्यावर मुलीच्या कारला भरल्या डोळ्यांनी पाहणं ते नव्या सुनेचे स्वागत करण्या एवढं .
ट्रॅव्हल कंपनी बरोबरचा प्रवास म्हणजे ,
" चला हं जेवणाची पानं मांडली आहेत ."
किंवा
" बुफे तयार आहे सगळ्यांनी जेऊन जावे " .
आपण फक्त खुर्चीतून उठायचे कष्ट घ्यायचे .
प्रवासात हॉटेल शोधून राहण्याची मजा वेगळीच असते . तसचं नव्या शहरात रेस्टॉरंट शोधल्यावर ते जेवण जन्मभर लक्षात राहतं .
केसरी बरोबरचं जेवण ,
" जेवणाची व्यवस्था छान होती " हे सांगण्यापुरतं राहतं .
मस्त थंडी आहे . गुगलराव आहेत चं जवळपास .
वाट कसली बघतायं .
करा प्लॅनिंग सुरू ..
विश्वास बीडकर .
१७ जानेवारी २०२३ .

184 

Share


Written by
विश्वास बीडकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad