ती हवी सुसंस्कारी, शिकलेली अन पैसे कमावणारी,
स्वतःचं मन मारून, मात्र इतरांची हृदय जिंकणारी
ती खंबीर असूनही तोच घेतो तिचे सर्व निर्णय
अशा 'आधुनिक' पुरुषाचे मी काय करू वर्णन
तिची अवस्था जणू, किल्ली भरलेल्या बाहुलीगत
कुणी घेत नाही ध्यानीमनी, तिचे स्वतःचे मत
तिच्या खात्याची शिल्लक, एटीएमचा पिन त्याला माहित, महिन्याच्या किराण्याची, कामांची यादी फक्त तिच्या वहीत, तिच्या पंखात बळ असताना ती सांभाळते घरटे
एका निर्णयाने तेच घर होते काही क्षणात परके कलियुगातील 'स्त्री' म्हणजे आहे एक आधुनिक गुलाम,
अशा अहंकारी पुरुषत्वाला कोणता लावावा तरी लगाम, '
स्वाभिमानी' स्त्रीयांची समाजाला वाटते जणू खूप भिती, कारण त्यासाठी तोलावी लागतात खुप जवळची नाती
मनातल्या मनात अशा स्त्रियांची होते नेहमी घुसमट
सोन्याच्या पिंज-यात कोंडला जणू बोलका पोपट