Bluepad | Bluepad
Bluepad
काहीवेळा वाटते
Shashikant Harisagam
Shashikant Harisagam
17th Jan, 2023

Share

खरच असे का घडते ?
........................................
खरंच काहीवेळा वाटते ' हे असं का होते '. होते खरे पण असं काही होण्याचे ते खरे तर वय नसते.होईल असं काही वाटत नसले तरी होऊन जाते. वय उतारावर आले कीं एखादंवेळी होते असं. ' वय झालेय होणारच ' वयापाठीमागे क्षणिक लपून त्याचे समर्थन होते.
त्यांच्या डोक्यात विचार गरगरत होते. आतासारखे गाडीने भुरकन ऑफिसला गेले आणि तितक्याचं
शिताफिने ऑफिस सुटल्यावर घरी परत येण्याचा आजच्या सारखा काळ नव्हता... घरटी दारात चारचाकी असल्याचा!रस्त्यावर चारचाकी अभावाने दिसायच्या. प्रत्येक गावं सायकलीची गावं होती.
तो सायकलवरून ऑफिसमधून घराकडे येतं होता.कशी झोकात चालली गवळ्याची पोरं सायकल अशी चाललेली.
अगदी नवीनवी छान दिमाखदार अशी सायकल घेऊन चारपाच महिले तर झाले असतील. सायकलचे नवेपण आज आत्ता या क्षणालाही लख्ख नवीन वाटावे असे होते. नवीकोरी सायकल हौसेने तिला गंध पावडर केली. तिला स्टॅन्ड जोडले उत्तम प्रतीचे स्टॅण्डवर टेकायची सायकलअगदी टेचात उभी सौदंर्यवती भासायची. तिला अंधारातून प्रकाशातला प्रवास सुखाचा व्हावा म्हणून डायनोमा बसवला. चेंन कव्हर चेंन अगदी शाल अंगावर लपेटून बसली.हॅण्डलच्या पुढच्या अंगाला सामनासाठी बकेट. हॅन्डल्ला अंगठ्याने दाबून टिरिंग ss टिरिंग आवाज करणारी घंटी. सारे साज अंगावर लेवून सायकल शृंगारली होती.तीचे देखणेपणामुळे तिला मी दिलेले ' लाजवंती ' नाव ती मडगार्डवर अभिमानाने मिरवत होती.
घर आले कधी कळले नाही. सायकल भिंतीला लावली. आत सौ किचनमध्ये. बहुधा चहा बनवत असावी. हॉल मध्ये डोकावून पहिले. दोन्ही पोरे शाळेतून येऊन अभ्यास करत बसलेली. दोघांपुढे
पसरलेली पुस्तक -वह्या सांगत होती.
तो आत आला. किचनमध्ये डोकावून म्हणाला,
' जरा पोहे कर बुवा. आज पोहे खावेसे वाटतात. '
' आणून द्या पोहे, देते करून ' सौभाग्यवती म्हणाल्या.
' संपले का पोहे ? ' त्याने विचारले
' पोहेच काय सारा किराणा संपलाय ' सौ ने आठवण दिली, ' मागच्याच आठवड्यात किराणा भरणार होतात. बारामतीला मॉलला जाऊन. आळस केलात. म्हणालात पुढल्या रविवारी भरू नक्की...'
मी हॉलमधल्या मुलाला आवाज दिला..,
' सोन्या, जा खंडेलवाल चाळीतल्या भांडारातून एक किलो पोहे घेऊन ये. '
सोन्याने काही उत्तर देण्याऐवजी सोन्याची आईच ओरडली,
' अहो, परीक्षा चालू आहेत पोरांच्या.... सोन्याचा तर गणिताचा पेपर....'
दुसऱ्या पोराला मी काही सांगण्याआधीच दोन्ही पोराच्या परीक्षा चालू आहेत. जाणार नाहीत ती कुठे असे त्यांच्या आईनेच अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केल्याने. रागातच मी उठलो. बाहेर आलो. तावातावात भिंतीला लावलेली सायकल घेतली. तिच्यावर टांग मारून ' येतो ग मीच पोहे घेऊन येतो.' असे सांगून वेगात पायडल मारीत खंडेलवाल चाळीतल्या भांडारा कडे रागात दौडला वीर संसारीचा एक असे कुच केले.
' एक किलो पोहे दे... '
' पिशवी आणलीय का...? '
' नको दे खिशात घेऊन जातो....'
काय पण हे दुकानदार. ? मन चडफडलं. काहीही विचारतात.
दुकानदाराने कॅरीबॅगमध्ये वजन करून कॅरीबॅगमध्ये दिलेले एक किलो पोहे घरी आणून सौभाग्यवतीने मस्त पोहे केले प्लेटमध्ये पोहे त्यावर खोबऱ्याचा कीस,शेंग दाणे, प्लेटमधल्या पोह्यावर कोथींबीर पसरून तिथे लिंबाची फोड पेरली. मी, दोन मुले आणि सौभाग्य वती सर्वांनी मिळून खाल्ले.
दोन्ही मुले पुन्हा परीक्षा मुडवर. सौ किचन मध्ये.
आवरावर करायला.
पाणी प्यालो मी. पेपर घेऊन बाहेर आलो... या सगळ्या गडबडीत तास दोन तास गेले. साडे सात वाजलेले.
पहिले इकडे तिकडे. ज्या जागेवर मी नेहमी सायकल ठेवतो तिथे माझी ' लाजवंती ' सायकल नाही.कुठे गेली लाजवंती ? सगळी कडे पहिले . लाजवंती दिसेना.
लाजवंतीला घेऊन घेऊन पोहे आणायला गेलो इतके स्वच्छ आठवत होते. परत लाजवंती मजबरोबर होती का? आठव आठव आठवण्याचा प्रयत्न केला.साला आठवेना.काय झाले असावे लक्षात येताच...
धस्स झाले.पोटाला खळबळले.
जास्त बोंबाबोंब करावी तर सौभागवतीने घरासकट अंगण डोक्यावर घेतले असतेच. मलाही गर गर फिरवले असते शब्दाचा भडीमार करून.
' जरा बाहेर जाऊन येतो येथे जवळच....' म्हणून मी घरातून बाहेर सटकलो. वाऱ्याच्या वेगाने खंडेलवाल चाळीतल्या भांडाराकडे आलो.
लाजवंती भांडारच्या भिंतीला टेकून उभी होती. माझ्याकडे छदमीपणे हसत...
मी सायकलवर खंडेलवाल चाळीकडे गेलो. पोहे घेतले तसाच लाजवंती तिथेच ठेवून आलो चालत घरी येऊन पोहे खाऊन tas-दीड तास झाला तरी लक्षात नाही आले.
ह्या विसराळू पानाची त्याला आजही आठवण झाली कीं हे असे का व्हावं? असेच का घडावे ? असे काही होण्यासाठी ही वयाची अवेळ नाही का? वयोमानानुसार माणसाची स्मृती अंधुक होते हे समजू शकते पण तरुणपणाच्या नाक्यावरले हे विसराळूपण याचे गाणी सुटत नाही.असेच वाटते. वाटत राहते.'
मी लाजवंतिकडे पहिले. तिने मला पहिले. जणू माझ्याशी बोलली. म्हणाली,
' असे काहीतरी घडतं. हे का घडते. उत्तर शोधायचे नसते. जगण्याला ऊर्जा देणारे हे क्षण जपायचे. आठवतील त्या त्या वेळी आपणच आपल्याशी हसायचे '
मी सायकल घराच्या भिंतीला लागून ठेवली. घरात गेलो. घरात हसरे तारे अभ्यासात. सौभाग्यवती तारे जमीनपर सॉरी भांडी ओट्यावर घेऊन जेवणासाठी काय करावे उत्तर शोधात होती. काय झाले कोणास पत्ता लागला नाही. त्यानंपण हू का चू केले नाही.
'तेरी भी चूप मेरी भी चुप, आठवेल ज्याज्यावेळी तेव्हा आनंद घ्यायचा गुपचूप.
.... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर.

184 

Share


Shashikant Harisagam
Written by
Shashikant Harisagam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad