Bluepad | Bluepad
Bluepad
भटकंती माणदेशाची, प्रवास मंदिरांच्या देशाचा
सौरभ तात्यासाहेब जाधव
17th Jan, 2023

Share

भटकंती माणदेशाची, प्रवास मंदिरांच्या देशाचा
मागील लेखात आपण केलेल्या माणदेश भटकंती मधील शिखर शिंगणापूर या मंदिराची माहिती बघितली, आपण आता म्हसवड येतील सिद्धेश्वर मंदिर याची माहिती पाहणार आहोत. पण त्या आधी त्याचा प्राचीन संदर्भ आपण जाणून घेऊ.
प्राचीन महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत असताना या राज वंशा विषयी समजून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
प्राचीन महाराष्ट्राला प्रभावी व कर्यशक्षम राजकीय वारसा लाभलेला आहे. प्राचीन महाराष्ट्र हा राजकीय, आर्थिक, प्रशासकीय व सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द होता. या महाराष्ट्रात १३ लक्ष वर्ष पूर्वी मानवी जीवन अस्तित्वात होते हे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होते. महाराष्ट्रात अनेक राजवटींच्या सत्ता होत्या, त्यातीलच एक राजवट म्हणजे चालुक्य राजवट.
चालुक्य राजवटी मध्ये आपल्याला दोन राजवंश बघ्याला मिळतात. पहिले बदामीचे चालुक्य, दुसरे कल्याण ( णी ) चे चालुक्य. माणदेशातील काही भागांवर कल्याण ( णी ) चालुक्य या राजवंशाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो तो म्हणजे येतील मंदिरांवरून. म्हसवड येतील सिद्धेश्वर मंदिर असो की पुसेसावळी येतील साबळेश्वर मंदिर.
म्हसवड येतील सिद्धेश्वर मंदिरात एक शिलालेख आहे तो कन्नड भाषे मध्ये आहे. ह्या शिलालेखा मध्ये मंदिरा संधर्भात थोडी माहिती आहे ती अशी की,
#चालुक्य_चक्रवर्ती_जगदकमल्लाची_१०_वर्षाची_राजवट_चालू_असता_त्याचा_महा_मंडलेश्वर_बिज्जलदेव_मंगळवेढ्याच्या_शिबिरातून_अत्यंत_सुख_समाधाने_राज्य_करीत_असता_एका_शुभ_मुहूर्ता_निमित्त_हजार_गाई_ब्राम्हणांना_दान_करत_असता_त्याचा_पाडपघोष_जीवी_महाप्रधान_संधिवीग्रह_दंडनायक_कळीम(रस)_आणि_प्रमुख_कारणाधिन_मिळूण_म्हसवड_१२_येथिल_सिद्धेश्वर_देवास_अंगभोग_चैत्र_पैत्रासाठी_म्हसवड_येथील_भुमी_दान_दिली_आहे_सदरील_दान_भूमी_स्पर्श_करून_धरापूर्वक_आचंद्रक_करून_दिलेली_आहे_ह्या_भूमी_पैकी_काही_भूमी_सेवकांसाठी_सुद्धा_दिली_आहे.
पुढील मजकूर हा पुसट झाला असल्याने काय लिहले आहे ते वाचता येत नाही त्यातील ठराविक अक्षरे फक्त ओळखू येतात. हा शिलालेख चालुक्य राजवटीतील आहे हे आपल्याला समजते ते राजाच्या नावावरून. तर असा हा शिलालेख.
म्हसवड चे सिद्धेश्वर मंदीर ११ व्या किंवा १२ व्या शतकात बांधले असावे असा अंदाज आहे. हे मुळात पातळलिंगी आहे. ह्या मंदिराचा जिर्णोद्धार साधारण १६, १७ शतकात करण्यात आला, त्या वेळी गर्भगृहाची उभारणी कर्त्या वेळी काही उंचीवर पुन्हा अधिष्ठान तयार करून त्यावर आता असलेली सिद्धनाथाची मूर्ती बसवण्यात आली. हे मंदिर एक मीटर उंचीच्या अधिष्ठानावर उभारलेले असून त्याचे विधान ताराकृत आहे.
सिद्धेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार चे चालुक्य कालीन असून ते पाच शाखी आहे. पहिल्या शाखे वर भैमित्तिक नक्षी आहे, तर दुसरी पद्म शाखा, तिसरी घटपल्लव युक्त शाखा, चौथी घंटाचे अलंकरण व गंधर्व किन्नर शाखा, पाचवी पद्म पत्राची शाखा आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे चालुक्यकालीन मुळ मंडोवर व अधिष्ठान मुळ स्थित ठेऊन विस्कळीत झालेले मंदिर हे १७ व्या शतकात उत्कृष्ट प्रकारे बांधण्यात आले आहे.
मंडारकावर किर्तिमुख असून त्याच्या दोन्ही बाजूस शैव द्वारपाल, चवरीधारिणी व कुबेर आहे. ललाटबिंबावर गणेश असून उत्ताररांग शिळेवर व्याल कोरले आहेत. त्या वरील शिळेवर भौमितिक नक्षी कोरलेली आहे. गर्भगृहात नाथ व त्यांची पत्नी जोगाबाई यांची मूर्ती आहे. सिद्धनाथाची मुळ मूर्ती ही भैरवीची आहे तर जोगाबाई ची मुळ मूर्ती पार्वतीची आहे. या मूर्ती च्या खाली एक भुयार आहे त्या भूयारामध्ये शिव पिंड आहे. अंतराळ चार अर्ध स्तंभावर उभे असून स्तंभाचे तरंग हस्त नागबंध युक्त आहे. स्तंभावर हत्ती, वृषभ, गंधर्व, हंस, व भौमितिक नक्षी आहे. अंतराळाच्या डाव्या बाजूस एक देवकोष्ठात गरुडाची मूर्ती आहे तर, उजव्या बाजूच्या देवकोष्ठात भैरवाची मूर्ती आहे. सभा मंडप १६ स्तंभांवर उभा असून त्या पैकी चार पूर्ण स्तंभ आहेत, सभा मंडपाचे प्रवेशद्वार चार शाखी आहे. मंडारकावर किर्तिमुख असून त्याच्या बाजूला शैव द्वारपाल आहेत. ललाटबिंबावर गणेश असून, उत्तरंगशिळेवर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मंडपानंतर एक मोकळा चौकोन असून त्याच्या चारी बाजूने ओवऱ्या आहेत, उजव्या बाजूच्या ओवरी मध्ये एक कन्नड भाषेतील शिलालेख आहे तो आपण वरती समजून घेतलेला आहे. या पुढे प्रवेशद्वार व आयताकार मंडप आहे. पुढे प्रारंगणात हत्ती ची सुंदर अशी काळ्या दगडातील मूर्ती आहे. मंदिराच्या प्रकारात ५ दीपमाळ आहेत, व त्यातील एक दीपमाळ भव्य व सुंदर आहे. प्राकारात काही वीरगळ व समध्या आहेत. त्यातील सामध्या अलीकडील काळातल्या आहेत.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे इंडो इस्लामिक पद्धतीचे आहे. प्रवेशद्वारावर गज शिल्प व कमळ पुष्प कोरलेली आहेत.
मंदिराच्या बाजूस एक पडका वाडा आहे तो वाडा माने नामक सरदाराचा आहे. म्हसवड चे माने हे विजापूर दरबारी सरदार होते. म्हसवड च्या सिद्धनाथाचा‌ दर वर्षी रथ उत्सव असतो. ही रथ यात्रा खूप बघ्याण्या सारखी असते एकदा अवश्य म्हसवड च्या सिद्धनाथाला भेट द्या.........
लेखन :- सौरभ तात्यासाहेब जाधव
#भटकंती_सह्याद्रीची_परीवार_वाई

179 

Share


Written by
सौरभ तात्यासाहेब जाधव

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad