दोन्ही तळपाय मातीत घालून
दोही करी दो पायावरी ओली माती ओढून
वरीच्या वरी केला दो करी
जोरजोराने थापथोपा
घेतले हळूच तळपाय काढून
झाला बाळाचा छान खोपा
म्हणे बाळ आपल्या बापा
बाबा तुम्ही खोप्यात झोपा
नाही लागणार ऊन वारा
लागणार नाही थंडी गारा
बाच्या मना बाळस्नेहाचा उबारा
बाने केला बाळाच्या आईस पुकारा
बा म्हणे बाळाच्या आई
चिमुकल्याच्या कलेची पहा नवलाई
खेळ खेळतो चिखल माती
मातीसी त्याची जुळली नाती
ओतले मातीत पाणी झाला चिखल
केली खेळणी विविध पशुपक्ष्यांची नक्कल
चिखलाची गाय , बैल , चिखलाचा कुत्रा नि मांजर
कुत्र्याला खाण्यास केली चिखलाचीच भाकर
चिमणी , कावळा , राघू , मैना
इवल्याश्या खोप्यात ते काही जाईना
बाळास पडलं मोठं कोडं
चढली तार बाळ झोपला खोप्यापुढं
टाकलं काम आईनं जागच्या जागी
घेतलं उचलून तयास आपल्या ओसंगी
आले आभाळ दूरून भरून भरून
पडला पाऊस सरीवर सरी सरसरून
वाहिले पाणी रानात खळा खळा
झाली खोपा , खेळणी चिखलाचा गोळा
------------- धर्मराज रत्तू पवार