Bluepad | Bluepad
Bluepad
'मी' पणा'च्या धुक्यात आपल्या जवळची माणसंही दिसत नाहीत.⌨️
7
7878
17th Jan, 2023

Share

⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️
✍🏼
''मी पणा'च्या धुक्यात आपल्या
जवळची माणसंही दिसत नाहीत.
⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️
डिसेंबर महिन्यात आम्ही दिल्ली,वाराणसीला पर्यटनासाठी गेलो. घूक्यामुळ तीनचार तास ट्रेन धावल्या.टॅक्सी ड्रायव्हरही घूक्यात जपुन गाडी चालवु लागला.घुक इतक गडद होत की,प्रवासात ड्रायव्हरलाही दिसेना.असा धुक्याचा सामना करत असताना मला सहजच सुचल की,हे ऐकमेव धुक नसत. तर दुसरही धुक असत ते मी'पणाच्या अहंकाराच!
गाडी चालत होती तिच्या चाकाबरोबर माझ्याही विचाराच चाक चालुच होत.सारनाथ आल. तथागतांच दर्शन घेण्यासाठी मूतीॅजवळ जावुनही धुक्यामुळ मुतीॅ स्पष्ट दिसतही नव्हती घुक दाटल म्हणजे,
जवळचही जस स्पष्टपणे दिसत नसत.असच असत अहंकाराच्या धक्याचही ,ऐखादेवेळी अंधार परवडला निदान आपण टाॅर्चचा तरी उपयोग करतो.धुक्यातच अधिकाधिक अपघाताचे होतात.त्याचे किस्से आपण ऐकतो.हे धूक असत काहीवेळापुरत उन तापत जात अन घूक वातावरणात विरत.जस निसर्गातल्या घुक्याच तसच मानवी मनातल्या अहंकाराच्या धुक्याचही असत.आपणासमोर प्रश्न पडेल मानवी मनातल धुक कोणत?याच उत्तर आहे.मी'पणा!मीपणाचच धुक मात्र मरेपर्यंत विरत नसत तर ते अधिकाधिक गडद होत जात.
घुक्यात जस स्पष्टपणे दिसत नसत तसच "मी पणाच "धुकं दाटत तेव्हा जवळची माणसं सुद्धा स्पष्टपणे दिसत नसतात.आपल्याला प्रिय असणाऱ्या आणि ज्यांना आपणही प्रिय असतो अशीही माणस आपल्याला दुरावतात ती फक्त आणि फक्त आपल्या 'मी' पणाच्या' अहंकारी भावनेने.अशीच एक छानशी वाचनात आलेली कविता आठवते,
माझं माझं करताना आयुष्य हे असचं जातं!!
पैसा कमावत शेवटी नातं ही विसरुन जातं!!
राहतं काय अखेर राख ही वाहुन जातं!!
स्मशानात गर्व ही आगीत जळून जातं!!
मी आणि माझं हे नाव ही विसरुन जातं!!
कमावलेलं सगळं काही नात्यान मध्ये वाटुन जातं!!
सुख माझं असताना दुख परक करुन जातं!!
मी पणा करताना नातं कायमचं तुटुन जातं!!
शेवट अखेर शुन्य माझं माझं न राहतं!!
आयुष्यभर सांभाळलेल शरीररही सोडुन जात.
अगदी खरय!आपल अस काहीच अस नसत पण 'मी'आपल्यात आणि आपल्या नात्यात अहंकार आणतो.कोणत्याही नात्यात अहंकार नावाची कीड आली ती कीड नातं जास्त काळ टिकू देत नाही.
'मी'पणा विषयी अनेकजण अनेक उदाहरण अनेकजण देत असतात. अहंकाराचे आयडाॅल इतिहासात अनेक होते.रामायण काळात रावण,महाभारत काळात दुर्योधन,शकुनी,अफजलखान
औरंगजेब,हिटलर,सारखे अनेक अगदी मोठमोठ्या पदावरील व्यक्तींना याच 'मी'पणामुळ नामशेष व्हाव लागल.ही जरी आज आपल्यात नसली तरी,अतिरेकी 'मी' पणाच्या अहंकारामुळ त्यांच साध नावही उच्चारायला आजही आपणास नकोस वाटत.ही अहंकारी गेली त्यांच्याबरोबर 'मी'पणा गेला का?याचही उत्तर नाही येईल.नाही.
अशी माणस आपल्या अवतीभोवती रक्तसंबधात असतात.ती सतत मी,माझे,माझ्यामुळे असा स्वता:चा बडेजाव मिरवत असतात.अगदी साधा फोन करायचा असला तरी त्याने फोन केला नाही.'मी'च का फोन करू ? मीच का कमीपणा घेऊ? मीच का बोलू? ' असे बरेच 'मी' माणसांत आढळतात. पण याच ' मी पणाने' आपण आपलं खूप नुकसान करून घेत असतो.हे अहंकारी माणसांच्या लक्षातच येत नाहीआणि काहींच्या तर लक्षात येऊन देखील त्यांना त्यांचा 'मी पणा कुरवाळत बसणं जास्त महत्वाचं वाटत असत.
अशा अहंकारी माणसांचा आपणास रोज सामना करावाच लागतो.एखादी गोष्ट कमी जास्त होते तेव्हा यांना समोरच्याला समजून घेण्यापेक्षा त्यांचा मी पणा जपणं जास्त गरजेचं वाटत असत.'मी'पणा आपल्यातही असतो.हा'मी'पणा म्हणजे काय? आपणास ठाउकच आहे.मी पणा " म्हणजे अहंकार.माणसाने स्वाभिमानी असावं पण अहंकारी असू नये.
स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये खूप पातळ लाईन असते ती ओळखायला काही लोकांना जमतच नसत.जमल तरी,'मी'पणाला सोडावस वाटत नसत.वाटत हा स्वाभिमानच आहे.अस समजुन उमजुन आपण गोंजारत असतो. कधी स्वाभिमान अहंकारमध्ये रूपांतरित होतो.हे कळत देखील नाही.'मी पणा'चा अहंकार बाळगणारी माणसे स्वतःच्या गोष्टीच कश्या खऱ्या किंवा बरोबर आहेत हे सिद्ध करायच्या मागे लागलेली असतात, आणि त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय, त्याचाही विचार कदाचित बरोबर असू शकतो.असा विचार त्यांना नकोच असतो. त्यामुळे ते कधी कधी ऐकून ही घ्यायला तयार नसतात आणि काही वेळा ऐकून आणि त्यांना ते पटून सुद्धा ते ती गोष्ट मान्य करायला तयार नसतात.या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यापासून हळूहळू लोक दूर व्हायला लागतात.
बऱ्याचदा असंही दिसून येत की,अहंकारी माणसांना त्यांचे अवगुण सांगणारे,चुका सांगणारे आणि त्या चुका सुधारायला मदत करणारे 'खरे' मित्र नको असतात, तर त्यापेक्षा त्यांची स्तुती करणारे त्यांच्या 'मी पणाला ' खतपाणी घालणारी लोक अवतीभवती हवी असतात. कारण 'मी पणा' मध्ये 'मी' कुठे कमी आहे ?हा विचारच त्यांना अमान्य असतो.त्यांच्या मी'पणाचा अहंकारच त्याच्या विनाशाचे बीज रोवत अन रुजवत जातो.त्यांना मात्र हे उमजतच नसत. ते कस??यासाठी आपणास या कथेचा आधार घ्यावा लागेल.
एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की,एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने पाठलाग करत येत आहे.ती घाबरुन रानोमाळ पळत सुटते.वाघही तिच्यामागे धावत सुटतो.धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचते आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरते.वाघही देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरतो.त्या दोघांनाही कळून चुकलेल असत की,तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे.मात्र चिखल जास्त आहे.वाघ अन गायीतल अंतर कमी होते जात पण ते दोघेही रुतुन बसल्यामुळ काहीच करू शकत नव्हते.हळुहळु दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती.दोघेही हलू शकत नव्हते.
थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले,तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का?वाघ घुश्यात म्हणाला,मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही;मीच ह्या जंगलाचा मालक आहे.गाय त्याला म्हणाली,"असशील परंतु तुझी शक्ती याक्षणी काहीच उपयोगाची नाही.
वाघ गायीला म्हणाला"तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत ना?"गाय त्याला हसून म्हणाली,"बिलकुल नाही,माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला.जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते,त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण वाघ बाहेर काढला तर, त्यांच्याच जीवाला धोका उदभवु शकतो.
या कथेतून बोध हाच की,गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.
तर,वाघ हे आपले अहंकारी मनाच.सर्वशक्तिमान असुनही अहंकारी माणसांचही असच होत.तो बुद्धिमान,बलवान असल्याचा त्याला अहंकार झाला की,त्याच्या कार्यास आपोआप उतरता सुरु होते.या अहंकारापोटी मोठमोठी साम्राज्येही धुळीस मिळाली.तिथे सामान्यांविषयी वेगळ बोलायलाच नको?कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही.परंतु मीच श्रेष्ठ आहे,मला कोणाच्याही मदतीची गरजच नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवतो.अशा अहंकारी माणसाला तुकोबांनीचांगलेच फटकारले,
मुके होता काय पदरिचे जाते,मूर्ख ते भोगिते मी मीपण ।।१।।
आपुलिये घरी मैंद होउनि बैसे कवणासी ऐसे बोलो नको .।।२।।
तुका म्हणे तुम्हा सांगतो मी खूणदेवासी ते ध्यान लावुनि बैसा ।।३।।
तुकोबा अशा मुर्खांशी संबधच ठेवू नका.अस उपदेशतात.ते म्हणतात.व्यवहारात उत्तम,मध्यम आणि अधम असे माणसाच्या वागणुकीवरुन भेद केले जातात.अशा अहंकार्‍यांना ऊत्तम,मध्यम तर म्हणताच येत नाही मग ती काय झाली?या सार्‍यात 'मी'पणा असतोच.तो प्रमाणात असण हेही गैर नाहीच.पण जेव्हा 'मी' पणा सोडतो.तेव्हा तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकत असतो.पण यासाठी आपण निवांत बसून परिपक्वतेने विचार केला तर आपणही अहंकारापोटी आजवर अनेकांना दूखावल अन अनेकांनी आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं.वाटल त्यांच्यावाचुन आपल काय अडतय?तसतर, कुणावाचुन कुणाच अडत नसत अन जगरहाटी कुणासाठी थांबतच नसते.हे विश्व करोडों वर्षापासून आहे.कित्येक आले आणि गेले.
राम कृष्णही आले गेले। तयां विना हे जग ना अडले।।
कुणीं सदोदित सूतक धरिलें। मग काय अटकलें मजशिवाय।।
माहीत असुनही आपण आपला अहंकार जोपासत नात्यांना दुरावत जातो.बर्‍याचदा,तर समोरच्या व्यक्तिच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, अन् आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही.म्हणून
कुणाची कितीही मोठी चूक असली तरी,ती आयुष्यापेक्षा व नात्यापेक्षा मोठी नसतेच.नाती म्हणजे कुठलाही व्यवहार नसतो पण व्यवहारच बनत चालला आहे.तू एवढं केलं तर,मी तेवढं करेन किंवा कोणाचं तिकडं काय व्हायचं ते होउदे पण मी मात्र माघार घेणं नाही.कारण मी बोलतोय तेच बरोबर आहे. आपण नात्यात मोजून मापून गोष्टी करत जातो.नात जपण्याचे प्रयत्न हे दोन्ही बाजूंनी व्हायला हवे असतानाही तसे झाले नाही.अहंकार नावाच्या वाळवीन नातं पोखरत गेल.मन दुखावतच जातात.नाती कायमची दुरावतात.स्ट्रेस येतो.त्याच रुपांतर हर्ट अटॅकमध्ये होत.कायमच दुखण नशीबी येत.याच कारण अहंकार
दोन्हीकडुन जोपासला गेल्यामुळ फोफावत गेल्यामुळ तो वाढत गेला त्याचबरोबर त्याला अहंकाराची वाळवी लागल्यामुळ पोखरत तर गेलाच. या वाळवीने नात्यांची इमारत पार ढासळुन टाकली.हा सहजतेन टाळताही येवु शकलाही असता पण त्यासाठी आपण मनापासुन प्रयत्न केले अन मोठ्या मनाने समजुन उमजुन अहंकाराला मुळापासुन नष्ट करता येते.त्यासाठी समजुन घेण गरजेच असत. समजुन घेण म्हणलं की,काही वेळा माघार घेणं,कमीपणा घेणं हे देखील आल.हा त्याचाच एक भाग असतो पण यात मोठी अडचण अशी की,या गोष्टी अहंकारी माणसांत नसतात.ते मोडतील पण वाकणार नाहीत.अशा अहंकारी व्यक्तींना समोरच्या माणसांची किंमत करताच येत नाही.तो समोरच्याचा सातत्याने अपमानही करत जातो. मजेशीर भाग म्हणजे,काही अहंकारी लोकांकडे खरंच अहंकार करावा असं काहीच नसत.म्हणजे एखादी खूप जगावेगळी गोष्ट आहे किंवा खूप पैसे आहेत,खूपच चांगली नौकरी आहे किंवा आणखी काही आहे,असं काहीही नसलेली अहंकारी कित्येक लोक पाहायला मिळतात.यांना बघून नक्की यांना अहंकार आहे तरी कशाचा ? असाही प्रश्न पडतो. मी पणा करायला त्या 'मी 'मध्ये तसं भारी काहीतरी असायला सुद्धा हवं ना,की ज्यांच्या जोरावर यांना सगळी दुनिया यांच्या पायाशी हवी असते.अहंकार करावा अश्या गोष्टी असून देखील काही लोकांचे पाय जमिनीवरच असतात आणि ती माणसे नम्रपणे इतरांशी वागताना ही दिसतात.
अहंकार सोडण्यासाठी दुसऱ्याला समजून घेण्यासाठीचा ते प्रयत्न करताथ.त्याआधी ते स्वतःचा मी पणा बाजूला ठेवतात.अशा लोकांना अहंकारापेक्षा नाती जवळची वाटतात.त्यांची नाती घट्ट असतात.अशी माणसच सोन्यासारखी नाती आणि सोन्यासारखी माणसं जमवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात त्यांना जपतात.आयुष्यात येणार्‍या अन येवुन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांकड डोळसपणे पहात त्यांच्यातला अन आपल्यातला दुरावा दुर करतात.
अहंकार नावाचा महारोग दूर करावयाचा त्यांनी भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून घेवुन त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या.भावना क्षमाशील असते तर,अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो.भावना दुखावली,असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो.फार
गंभीरपणे न जगता,गंमतीने जगा,तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही.या जगात आपले काहीच नसते.त्यामुळे काही गमावल्याचे दुःखही करु नका.मी अमूक,मी तमूक असा अंहकार न बाळगता,इतरांच्या फालतु गोष्टीत नाक न खुपसता, क्षुल्लक गोष्टींने विचलित न होता,इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब न करता,कुणाला संपवण्याची भाषा न बोलता;अगदी लहान सहान गोष्टींचांही आनंद घ्यायला शिका.मनमोकळेपणाने हसा त्यासोबतच इतरांनाही हसवा आनंदाची पेरणी करा.साऱ्या जगाचा विचार करत न बसता; नसती चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करा.
क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपणच सुधारायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणारा चांगला् माणुस म्हणुन आपली ओळख बनवायला हवी.त्यासाठी आपल्यातल्या अहंकाराला त्यागायलाच हव.जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं. आपण हे जाणीवपूर्वक करावं असं मनापासून वाटतं.तेव्हा अधिक आनंदाने जगा. आनंदाने जगण्यासाठी सर्वांना मनमोकळ्या शुभेच्छा...
✍🏼--चंदु चक्रवार ©
⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️
✍🏼

175 

Share


7
Written by
7878

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad