Bluepad | Bluepad
Bluepad
कडाडणारी थंडी
Shashikant Harisagam
Shashikant Harisagam
17th Jan, 2023

Share

कुडकुडणारी थंडी अाणि शाल........
.....................................................
...... शशिकांत हरिसंगम.
मेंढराना त्याच्या नेत्यानं सांगीतलं कि,यंदा थंडीपासून रक्षण करण्यासाठी प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल दिली जाईल. अापल्या मालकाला अापली किती काळजी अाहे या विचाराने त्या मुक्या प्राण्याना त्याक्षणी खूप बरं वाटलं. कडाक्याच्या थंडीत ही त्यांच्या अंगावर अानंदाचा एक थरार लहरुन गेला.
ताफ्यातली सारी मेढंरं खुष झाली. अाता शाल मिळणार लई भारीच. मालक पण भारीच. मालकाचा नाद नाय करायचा.
बॅबॅ बॅ बॅ अानंदान अासमंतामध्ये अावाज पसरला.
ताफ्यातल्या एका कोकरानं थोड्यावेळानंतर अापल्या अाईला विचारलं." अाई अापला मालक अापल्याला लोकरीची शाल देणार हे ठीक अाहे पण त्यासाठीच्या लोकरीचं काय ? ती कोठून अाणणार ? "
त्या कोंकराच्या प्रश्नानं मात्र भयाण शांतता पसरली. बाहेर पडत चाललेल्या अंधार अाता कळपातल्या मेंढराच्या कोकराच्या मनात उतरु लागला.
निवडणुकीच्या वेळी राजकिय नेते कर्जमाफी पंधरा दिवसात देण्याची भाषा करतात,फ्री गहू, लॅपटाॅप,तांदूळ, प्रत्येकाच्या त्याच्या मासिक गरजे इतके पैसे टाकण्याची बोली बोलतात,वगैरे घोषणाचा पाऊस पाडतात तेव्हा लोका या पावसात अानंदाने का भिजतात. ?
एवढं सारं करायला सरकार पैसे कुठून अाणणार ? प्रश्न नाही पडत कुणाला ?
मिळणार च्या अानंदात अाणणार कुठुन ? नगण्य वाटतं !
अाणणार अापल्यालाच लूटून ...अापल्यालाच कापून समजलं अापलंच अंग सोलून हे समजलं ना माणूस अबोल होतो.
अापल्याला शाल देणार लोकरीची अापल्याला सोलून !
त्यात ऊब येईल ? कुडकुडायला लावणारी थंडी जाईल ?
माणूस माकडापासुन बनलाय.
मेंढ्यापासून नाही ?
.....शशिकांत हरिसंगम

189 

Share


Shashikant Harisagam
Written by
Shashikant Harisagam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad