Bluepad | Bluepad
Bluepad
मुलांची बुद्धिमत्ता average असेल तर ते काळजीचे कारण आहे का?
संजय(9820970114)
संजय(9820970114)
17th Jan, 2023

Share

Crystal intelligence v/s fluid intelligence :
सोबतच्या दोन chess board मध्ये काय फरक आहे?
ज्याने बुद्धिबळ हा खेळ फारसा खेळला नसेल त्याला दोन बोर्ड मधील रंगाचा फरक लगेच लक्षात येईल. कदाचित त्याला अजून काय फरक आहे ते विचारले तर तो दोन पैकी एका बोर्डातील खालून डाव्या बाजूच्या चौकटीचा रंग फिका तर दुसऱ्या बाजूच्या बोर्डातील तोच रंग गडद आहे हे सांगता येईल.
नेहमी चेस खेळणारा सहा सात वर्षाचा मुलगा एक बोर्ड चुकीचा मांडला आहे हे बघता क्षणी सांगेल. कारण हा खेळ खेळायचे नियम त्याला माहीत असतात. कधीच चेस न खेळलेल्या मुलासाठी रंगाचा फरक जास्त महत्वाचा वाटेल.
आता कुणी हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीत विचारला आणि त्यावरून मूल्यांकन केले तर ही चाचणी पक्षपात करणारी होईल. कारण इथे मुलाची आकलन क्षमता मोजली जात नसून बुद्धिबळ खेळातील ज्ञान मोजले जात आहे. असे कमावलेले ज्ञान त्या क्षेत्रात यश मिळायला मदत करते.
हे ज्ञान स्वतःहून मिळवू शकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता अशी काहीशी सैल व्याख्या करता येईल.
परंतु आज कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तर कुणाही व्यक्तीला सर्व ज्ञान स्वतःहून मिळवणे अशक्य आहे. एखाद्याच्या कौशल्य विकसित होण्याच्या प्रक्रियेत बुद्धिमत्ता आणि उपलब्ध ज्ञान आणि त्यावर घेतलेले परिश्रम तसेच संधी या सर्वाचा समावेश असतो.
बुद्धिमत्ता average असण्याची शक्यता अंदाजे 65 टक्के असते परंतु आपण स्वतःला नेहमी इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान मानत असतो. त्यामुळे आपली किंवा आपल्या मुलाची बुद्धिमत्ता सरासरी मध्ये आली तर धक्का बसू शकतो.
एखाद्या विषयात मुलाला गती नसेल तर बुद्धिमत्तेच्या ऐवजी इतर घटक कारणीभूत असू शकतात. उदाहरणार्थ शिक्षक किंवा शाळेतील परिस्थिती इतकेच काय सकाळी डोळ्यावर झोप असताना शाळेत जावे लागणे हे देखील महत्वाचे कारण असू शकते.
विज्ञान किंवा संशोधन क्षेत्र वगळता बऱ्याच क्षेत्रात सरासरी बुद्धिमत्ता असणारे योग्य प्रशिक्षण आणि मेहनत या बळावर पुढे जावू शकतात.
#psychology_sanjay

228 

Share


संजय(9820970114)
Written by
संजय(9820970114)

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad