सरण
शेवटी या लागते अतीच
हे सगळ्याईले आहे ठाऊक
मग हे माय ते माय
कौन करते काय ठाऊक
जनम भर मर मर करते
चिल्या पिल्या इ साठी
शेवटी कोनीच नसते सोबतीले
सरणा वरच्या लाकडा सोबत गळा भेटी
एकटा येते त मुट्टी असते बांधून
जाते एकटा तो सरणावर
त्या वेळेस मूटठी असते सोडून
लोक शोक करतात फक्त मरणावर
हा जन्म आहे मोलाचा
सर्वान सोबत चांगलं वागण्याचा
मेल्या वरही अमर होण्याचा
हा सल्ला मा लाख मोलाचा
म्हणून म्हणतो तुले
तू वाग माणसा सारख
सरणावर गेल्यावर
उठता येत नसते सारख सारख
-गोपाल मुकुंदे