"मी अन् माही कविता"
असं येते कायजात
गच्च भरून अभाय
मन घेते पेन हाती
होते मेंदूत उलाय ........!!
भराभर कागदात
उतरते सोनसरी
होते अभायचं रितं
अलगद माहया उरी .........!!
भावनेचं पीक असं
मोठ जोमात पिकते
कायजातलं वादय
ओळी ओळीत टिकते ........!!
येते भरून शिवार
माहया कवितेनं सारं
सुख भेटते घळीत
दुःख जाते दूर पारं ........!
जवा असतो एकटा
गुणगुणतो न भीता
सोबतीला संगमंग
मी अन् माही कविता .........!!
विशाल कन्हेरकर
निंभा जि अमरावती
मो 9172298839